________________
प्राकृत व्याकरणे
३५१
(सूत्र) यादृशादे१स्तिः ।। ३१७।। (वृत्ति) पैशाच्यां यादृश इत्येवमादीनां दृ इत्यस्य स्थाने ति: इत्यादेशो भवति।
यातिसो। तातिसो। केतिसो। इतिसो। भवातिसो। अातिसो।
युम्हातिसो। अम्हातिसो। (अनु.) पैशाची भाषेत, यादृश, इत्यादि प्रकारच्या शब्दामधील दृ याच्या स्थानी
ति असा आदेश होतो. उदा. यातिसो.....अम्हातिसो.
(सूत्र) इचेचः ।। ३१८॥ (वृत्ति) पैशाच्यामिचेचोः स्थाने तिरादेशो भवति। वसुआति। भोति।
नेति। तेति। (अनु.) पैशाची भाषेत इच् आणि एच् (या प्रत्ययां) च्या स्थानी ति असा आदेश
होतो. उदा. वसुआति...तेति.
(सूत्र) आत्तेश्च ।। ३१९।। (वृत्ति) पैशाच्यामकारात्परयोः इचेचो: स्थाने तेश्चकारात् तिश्चादेशो भवति।
लपते३ लपति। अच्छते अच्छति। गच्छते गच्छति। रमते रमति।
आदिति किम्? होति। नेति। (अनु.) पैशाची भाषेत (धातूच्या अन्त्य) अकारापुढील इच् आणि एच् (या प्रत्ययां)
च्या स्थानी ते आणि (सूत्रातील) चकारामुळे ति असे आदेश होतात. उदा. लपते...रमति. अकारापुढील (इच् आणि एच् यांच्या स्थानी) असे का म्हटले आहे ? (कारण इतर स्वरापुढे ते हा आदेश होत नाही. उदा.) होति, नेति.
१ क्रमाने:- यादृश, तादृश, कीदृश, ईदृश, भवादृश, अन्यादृश, युष्मादृश, अस्मादृश. २ वसुआ (उद्वा- सू.४.११), भू, नी, दा. ३ लप् ४ आस् (सू.४.२१५ पहा)
५ गम् (गच्छ्) ६ रम्