________________
३५०
चतुर्थः पादः
(अनु.) पैशाची भाषेत ष्ट्वा याच्या स्थानी ठून आणि त्थून असे आदेश होतात.
पूर्वीच्या (म्हणजे सू.४.३१२ मधील) नियमाचा प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. नळून.....तत्थून.
(सूत्र) र्यस्नष्टां नियसिनसटा: क्वचित् ।। ३१४।। (वृत्ति) पैशाच्यां र्यस्नष्टां स्थाने यथासङ्ख्यं रिय सिन सट इत्यादेशाः क्वचिद्
भवन्ति। भार्या भारिया। स्नातम् सिनातं। कष्टम् कसटं। क्वचिदिति
किम् ? सुज्जो। सुनुसा। तिट्ठो। (अनु.) पैशाची भाषेत र्य, स्न आणि ष्ट (या संयुक्त व्यंजनां) च्या स्थानी अनुक्रमे
रिय, सिन आणि सट असे आदेश क्वचित् होतात. उदा. भार्या...कसटं. क्वचित् असे का म्हटले आहे ? (कारण नेहमी असे आदेश न होता, पुढील वर्णान्तरे होतात. उदा.) सुजो...तिटो.
(सूत्र) क्यस्येय्यः ।। ३१५।। (वृत्ति) पैशाच्यां क्यप्रत्ययस्य इय्य इत्यादेशो भवति। गिय्यते। दिय्यते।
रमिय्यते। पठिय्यते। (अनु.) पैशाची भाषेत क्य या प्रत्ययाला इय्य असा आदेश होतो. उदा.
गिय्यते...पठिय्यते.
(सूत्र) कृगो डीरः ।। ३१६।। (वृत्ति) पैशाच्यां कृगः परस्य क्यस्य स्थाने डीर इत्यादेशो भवति। पुधुमतंसने३
सव्वस्स य्येव संमानं कीरते। (अनु.) पैशाची भाषेत, कृ (या धातू) च्या पुढील क्य (या प्रत्यया) च्या स्थानी
डीर (डित् ईर) असा आदेश होतो. उदा. पुधुम.....कीरते...
१ क्रमाने:- सूर्य, स्नुषा, दृष्ट २ क्रमाने:- गै,दा,रम्, पठ्. ३ प्रथम-दर्शने सर्वस्य एव सम्मानः क्रियते।