________________
३४२
चतुर्थः पादः
(अनु.) मागधी भाषेत अनादि असणाऱ्या छ चा तालव्य-शकाराने युक्त च (म्हणजे
श्च) होतो. उदा. गश्च...पुश्चदि. व्याकरण नियमाने येणाऱ्या (छ) चा सुद्धा (श्च होतो. उदा.) आपन्नवत्सलः ... पेस्कदि. अनादि असणाऱ्या (छ चा) असे का म्हटले आहे ? (कारण छ आदि असेल तर श्च होत नाही. उदा.) छाले.
(सूत्र) क्षस्य कः ।। २९६।। (वृत्ति) मागध्यामनादौ वर्तमानस्य क्षस्य को जिह्वामूलीयो भवति।
यके। लरकशे। अनादावित्येव। खय-यलहला क्षयजलधरा
इत्यर्थः। (अनु.) मागधी भाषेत अनादि असणाऱ्या क्ष चा क (म्हणजे) जिव्हामूलीय (असा
क) होतो. उदा. य के, ल कशे. अनादि असणाऱ्या (क्ष) चाच (क होतो; क्ष आदि असल्यास, क होत नाही. उदा.) खय-यलहला (म्हणजे) क्षयजलधरा: असा अर्थ आहे.
(सूत्र) स्कः प्रेक्षाचक्षोः ।। २९७।। (वृत्ति) मागध्यां प्रेक्षेराचक्षेश्च क्षस्य सकाराक्रान्तः को भवति ।
जिह्वामूलीयापवादः। पेस्कदि। आचस्कदि। (अनु.) मागधी भाषेत प्रेक्ष् आणि आचक्षु (या धातूं) मधील क्ष चा सकाराने युक्त
क (म्हणजे स्क) होतो. (क्ष चा) जिह्वामूलीय (क) होतो (सू.४.२६९) या नियमाचा प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. पेस्कदि, आचस्कदि.
(सूत्र) तिष्ठश्चिष्ठः ।। २९८।। (वृत्ति) मागध्यां स्थाधातोर्यस्तिष्ठ इत्यादेशस्तस्य चिष्ठ इत्यादेशो भवति। चिष्ठदि। (अनु.) मागधी भाषेत स्था (या धातू) ला जो तिष्ठ असा आदेश होतो त्या (तिष्ठ)
ला चिष्ठ असा आदेश होतो. उदा. चिष्ठदि.
१ यक्ष
२ राक्षस