________________
चतुर्थः पादः
(अनु.) मागधी भाषेत, द्विरुक्त ट (म्हणजे ट्ट) आणि षकारानेयुक्त ठकार (म्हणजे ष्ठ) यांचा सकाराने युक्त टकार (म्हणजे स्ट) होतो. उदा. ट्ट (चा स्ट)
:
पस्टे... भस्टिणी. ष्ठ (चा स्ट)
शुस्टु...कोस्टागालं.
३४०
( सूत्र ) स्थ-योस्त: ।। २९१।।
( वृत्ति) स्थ र्थ इत्येतयोः स्थाने मागध्यां सकाराक्रान्त: तो भवति । स्थ। उवस्तिदेः। शुस्तिदे। थे । अस्तवदी । शस्तवाहे ।
:
(अनु.) मागधी भाषेत स्थ आणि र्थ (या संयुक्त व्यंजना) च्या स्थानी सकाराने युक्त त (म्हणजे स्त) होतो. उदा. स्थ ( चा स्त) :- उवस्तिदे, शुस्तिदे. र्थ ( चा स्त) :- अस्तवदी, शस्तवाहे.
( सूत्र ) ज - द्य-यां य: ।। २९२।।
(वृत्ति) मागध्यां जद्ययां स्थाने यो भवति । ज । याणदि । यणवदे। अय्युणे । दुय्यणे । गय्यदि । गुणवय्यिदे। द्य। मय्यं । अय्य५ किल विय्याहले आगदे। य। यादि६। यधाशलूवं । याणवत्तं। यदि । यस्य यत्वविधानम् आदेर्यो जः (१.२४५) इति बाधनार्थम् ।
(अनु.) मागधी भाषेत, ज, द्य आणि य यांच्या स्थानी य होतो. उदा. ज (च्या स्थानी य):- याणदि... गुणवय्यिदे. द्य ( च्या स्थानी य) : - मय्यं ... ३ . आगदे. य (च्या स्थानी य):- यादि... यदि 'आदेर्यो जः' या सूत्राचा (येथे ) बाध व्हावा यासाठी य चा य होतो असे विधान (प्रस्तुत सूत्रात) केलेले आहे.
४ मद्य
६ क्रमाने :
१ क्रमाने :- उपस्थित, सुस्थित
३ क्रमाने:- जानाति, जनपद, अर्जुन, दुर्जन, गर्जति, गुणवर्जित.
याति,
२ क्रमाने:- अर्थपति (अर्थवती), सार्थवाह
५ अद्य किल विद्याधरः आगतः ।
यथास्वरूप, यानपात्र, यदि.