________________
प्राकृत व्याकरणे
वील-यिणे पक्खालदु मम शयलमवय्य - यम्बालं ।। १।।
(अनु.) मागधी भाषेत रेफाच्या आणि दन्त्य सकाराच्या स्थानी अनुक्रमे लकार आणि तालव्य शकार होतात. उदा. र ( च्या स्थानी) :- नले, कले. स ( च्या स्थानी ) :- हंशे ... शोभणं. दोन्हींच्या ( स्थानी) :- शालशे, पुलिशे. ( तसेच :-) लहशवश... यम्बालं.
३३९
(सूत्र) सषो: संयोगे सोऽग्रीष्मे ।। २८९ ।।
( वृत्ति) मागध्यां सकारषकारयोः संयोगे वर्तमानयोः सो भवति ग्रीष्मशब्दे तु न भवति। ऊर्ध्वलोपाद्यपवाद: । स । पस्खलदि' हस्ती । बुहस्पदी | मस्कली३। विस्मये । ष । शुस्क ५ - दालुं । कस्टं । विस्तुं । शस्प-कवले'। उस्माः । निस्फलं १० । धनुस्खण्डं ११ । अग्रीष्म इति किम् ? गिम्ह-वाशले १२ ।
(अनु.) मागधी भाषेत, संयोगात असणाऱ्या सकार आणि षकार यांचा स होतो; पण ग्रीष्म या शब्दात मात्र (ष चा स) होत नाही. 'प्रथम असणाऱ्या (स् व ष्) चा लोप होतो' (सू. २.७७), इत्यादि ( नियमां) चा प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. स ( चा स ) :- पस्खलदि... विस्मये. ष ( चा स ) :शुस्कदालुं...धनुस्खण्डं. ग्रीष्म शब्दात (ष चा स होत) नाही, असे का म्हटले आहे ? ( कारण तेथे पुढीलप्रमाणे वर्णान्तर होते :-) गिम्ह... वाशले.
( सूत्र ) ट्ट - ष्ठयोस्ट: ।। २९०।।
(वृत्ति) द्विरुक्तस्य टस्य षकाराक्रान्तस्य च ठकारस्य मागध्यां सकाराक्रान्तः टकारो भवति। ट्ट। पस्टे १३ । भस्टालिका । भस्टिणी । ष्ठ। शुस्टु१४
कदं । कोस्टागालं १५ ॥
१ प्रस्खलति हस्ती |
५ शुष्क - दारु
९ ऊष्मा
१३ क्रमाने :- पट्ट, भट्टारिका, भट्टिनी
२ बृहस्पति ३ मस्करिन्
६ कष्ट
७ विष्णु
१० निष्फल
११ धनुष्खण्ड
१४ सुष्ठु कृतम्। १५ कोष्ठागार
४ विस्मय
८ शष्प-कवल
१२ ग्रीष्म-वासर