________________
३३०
चतुर्थः पादः
(अनु.) शौरसेनी भाषेत अनादि असणाऱ्या (म्हणजे) पदाच्या आदि नसणाऱ्या
तकाराचा जर तो (तकार) दुसऱ्या वर्णाशी संयुक्त नसेल तर (त्या तकाराचा) दकार होतो. उदा. तदो...एदाओ. अनादि (असणाऱ्या तकाराचा) असे का म्हटले आहे ? (कारण तकार पदाच्या आदि असल्यास त्याचा द होत नाही. उदा.) तधा...भोमि. असंयुक्त (तकाराचा) असे का म्हटले आहे ? (कारण तकार संयुक्त असेल तर त्याचा द होत नाही. उदा.) मत्तो...सउन्तले.
(सूत्र) अधः क्वचित् ।। २६१।। (वृत्ति) वर्णान्तरस्याधो वर्तमानस्य तस्य शौरसेन्यां दो भवति।
क्वचिल्लक्ष्यानुसारेण। महन्दो। निच्चिन्दो। अन्देउरं। (अनु.) शौरसेनी भाषेत दुसऱ्या वर्णानंतर असणाऱ्या त चा द होतो. क्वचित् (म्हणजे)
(उपलब्ध) उदाहरणांना अनुसरून. उदा. महन्दो...अन्देउरं.
(सूत्र) वादेस्तावति ।। २६२।। (वृत्ति) शौरसेन्यां तावच्छब्दे आदेस्तकारस्य दो वा भवति। दाव। ताव। (अनु.) शौरसेनी भाषेत तावत् या शब्दात आदि (असणाऱ्या) तकाराचा द विकल्पाने
होतो. उदा. दाव, ताव.
(सूत्र) आ आमन्त्र्ये सौ वेनो न: ।। २६३।। (वृत्ति) शौरसेन्यामिनो नकारस्य आमन्त्र्ये सौ परे आकारो वा भवति। भो
कञ्चुइआ। सुहिआ। पक्षे। भो तवस्सि। भो मणस्सि। (अनु.) शौरसेनी भाषेत (शब्दाच्या अन्त्य) इन् मधील नकाराचा संबोधनार्थी सि
(हा प्रत्यय) पुढे असताना आकार विकल्पाने होतो. उदा. भो कञ्चुइआ, सुहिआ. (विकल्प-) पक्षी :- भो तवस्सि, भो मणस्सि.
३ सुखिन्
१ क्रमाने :- महत्, निश्चिन्त, अन्तःपुर २ कञ्चुकिन् ४ तपस्विन्
५ मनस्विन्