________________
३२६
चतुर्थः पादः
(सूत्र) ज्ञो णव्व-णजौ ।। २५२।। (वृत्ति) जानाते: कर्मभावे णव्व णज इत्यादेशौ वा भवत: तत्संनियोगे क्यस्य
च लुक्। णव्वइ णज्जइ। पक्षे। जाणिजइ मुणिज्जइ। म्नज्ञोर्णः (२.४२)
इति णादेशे तु। णाइज्जइ। नञ्पूर्वकस्य। अणाइज्जइ। (अनु.) कर्मणि आणि भावे रूपात जानाति (ज्ञा) (या धातू) ला णव्व आणि
णज असे आदेश विकल्पाने होतात आणि त्यांच्या सांनिध्यामुळे क्य (प्रत्यया) चा लोप होतो. उदा. णव्वइ, णज्जइ. (विकल्प-) पक्षी :जाणिज्जइ, मुणिज्जइ. 'म्न ज्ञोर्णः' या सूत्राने (ज्ञा धातूतील ज्ञ या संयुक्त व्यंजनाला) ण हा आदेश झाला असता मात्र :- णाइज्जइ (असे रूप होते). नञ् (हे अव्यय) पूर्वी असणाऱ्या (ज्ञा धातूचे) अणाइज्जइ (असे रूप होते).
(सूत्र) व्याहृगेर्वाहिप्पः ।। २५३।। (वृत्ति) व्याहरते: कर्मभावे वाहिप्प इत्यादेशो वा भवति तत्संनियोगे क्यस्य
च लुक्। वाहिप्पइ। वाहरिजइ। (अनु.) कर्मणि आणि भावे रूपात व्याहरति (व्याहृ) (या धातू) ला वाहिप्प असा
आदेश विकल्पाने होतो आणि त्याच्या सानिध्यामुळे क्य (प्रत्यया) चा लोप होतो. उदा. वाहिप्पइ। वाहरिज्जइ.
(सूत्र) आरभेराढप्पः ।। २५४॥ (वृत्ति) आयूर्वस्य रभेः कर्मभावे आढप्प इत्यादेशो वा भवति क्यस्य च
लुक्। आढप्पइ। पक्षे। आढवीअइ। (अनु.) कर्मणि आणि भावे रूपात आ (हा उपसर्ग) पूर्वी असणाऱ्या रम् (या
धातू) ला आढप्प असा आदेश विकल्पाने होतो आणि (त्याच्या सांनिध्यामुळे) क्य (प्रत्यया) चा लोप होतो. उदा. आढप्पइ. (विकल्प-) पक्षी :- आढवीअइ.