________________
प्राकृत व्याकरणे
( वृत्ति) वेष्ट वेष्टने इत्यस्य धातोः कगटड इत्यादिना (२.७७ ) षलोपेऽन्त्यस्य ढो भवति। वेढइ। वेढिज्जइ ।
(अनु.) 'वेष्ट वेष्टने' (येथे सांगितलेल्या) वेष्ट् धातूत 'कगटड' इत्यादि सूत्राने ष् (या व्यंजना) चा लोप झाला असता (वेष्ट्च्या ) अन्त्य वर्णाचा ढ होतो. उदा. वेढइ, वेढिज्जइ.
( सूत्र ) समो लः ।। २२२।।
(वृत्ति) सम्पूर्वस्य वेष्टतेरन्त्यस्य द्विरुक्तो लो भवति । संवेल्लइ ।
(अनु.) सम् (हा उपसर्ग) पूर्वी असणाऱ्या वेष्टते (वेष्ट्) (या धातू) च्या अन्त्य वर्णाचा द्विरुक्त ल (म्हणजे ल्ल ) होतो. उदा. संवेल्लइ.
३१७
( सूत्र ) वोदः ।। २२३।।
(वृत्ति) उद: परस्य वेष्टतेरन्त्यस्य ल्लो वा भवति । उव्वेल्लइ। उव्वेढइ। (अनु.) उद् (या उपसर्गा) पुढे असणाऱ्या वेष्टते (वेष्ट्) (या धातू) च्या अन्त्य वर्णाचा ल्ल विकल्पाने होतो. उदा. उव्वेल्लइ. (विकल्पपक्षी :-) उव्वेढइ.
( सूत्र ) स्विदां ज्ज: ।। २२४।।
(वृत्ति) स्विदिप्रकाराणामन्त्यस्य द्विरुक्तो जो भवति । सव्वंगसिज्जिरीए । संपज्जइ'। खिज्जइ । बहुवचनं प्रयोगानुसरणार्थम् ।
(अनु.) स्विद् प्रकारच्या धातुच्या अन्त्य वर्णाचा द्विरुक्त ज ( म्हणजे ज्ज) होतो. उदा. सव्वंग...खिज्जइ. (सूत्रातील स्विदां हे) बहुवचन प्रयोगाचे अनुसरण दाखविण्यासाठी आहे.
( सूत्र ) व्रज - नृत - मदां च्चः ।। २२५।।
( वृत्ति) एषामन्त्यस्य द्विरुक्तश्चो भवति । वच्च । नच्चइ । मच्चइ।
(अनु.) (व्रज्, नृत्, आणि मद्) यां (धातूं) च्या अन्त्य वर्णाचा द्विरुक्त च (म्हणजे
च्च) होतो. उदा. वच्चइ...
१ सर्वाङ्ग - स्वेदनशीलायाः ।
... मच्चइ.
२ सम्+पद्।
३ खिद्