________________
चतुर्थः पादः
( वृत्ति) एषामन्त्यस्य द्विरुक्तो झो भवति । जुज्झइ । बुज्झइ । गिज्झइ । कुज्झइ । सिज्झइ। मुज्झइ।
(अनु.) (युध्, बुध्, गृधू, क्रुध्, सिधू आणि मुह्) यां (धातूं) च्या अन्त्य वर्णाचा द्विरुक्त झ (म्हणजे ज्झ) होतो. उदा. जुज्झइ...मुज्झइ.
३१६
( सूत्र ) रुधो न्धम्भौ च ।। २१८।।
(वृत्ति) रुधोऽन्त्यस्य न्ध म्भ इत्येतौ चकाराद् ज्झश्च भवति । रुन्धइ । रुम्भइ । रुज्झइ |
(अनु.) रुध् ( या धातू) च्या अन्त्य वर्णाचे न्ध आणि म्भ असे हे (दोन) आणि (सूत्रातील) चकारामुळे ज्झ (असे आदेश ) होतात. उदा. रुन्धइ...रुज्झइ.
( सूत्र ) सदपतोर्डः ।। २१९।।
( वृत्ति) अनयोरन्त्यस्य डो भवति । सडइ । पडइ ।
(अनु.) (सद् आणि पत्) यां (धातूं) च्या अन्त्य वर्णाचा ड होतो. उदा. सडइ,
पडइ.
( सूत्र ) क्वथवर्धां ढः ।। २२०।।
( वृत्ति) अनयोरन्त्यस्य ढो भवति । कढइ । वड्ढइ पवय - कलयलो । परिअड्ढइ लायण्णं। बहुवचनाद् वृधेः कृतगुणस्य वर्धेश्चाविशेषेण ग्रहणम्।
(अनु.) (क्वथ् आणि वृध्) यां (धातूं) च्या अन्त्य वर्णाचा ढ होतो. उदा. कढइ...लायण्णं. (सूत्रात वर्धाम् असे) बहुवचन वापरले असल्यामुळे ज्यात गुण केलेला आहे अशा (वृधू चे म्हणजे) वधू चे सुद्धा (कुठलाही) फरक न करता ग्रहण होते.
( सूत्र ) वेष्ट: ।। २२१।।
१ वर्धते प्लवग- कलकलः। २ परिवर्धते लावण्यम्।