________________
२८२
चतुर्थः पादः
(सूत्र) निष्टम्भावष्टम्भे णिछह-संदाणं ।। ६७।। (वृत्ति) निष्टम्भविषयस्यावष्टम्भविषयस्य च कृगो यथासंख्यं णिठ्ठह संदाण
इत्यादेशौ वा भवतः। णिठ्ठहइ। निष्टम्भं करोति। संदाणइ। अवष्टम्भं
करोति। (अनु.) निष्टम्भ विषयक आणि अवष्टम्भ विषयक कृ (या धातू) ला अनुक्रमे
णिट्ठह आणि संदाण असे हे आदेश विकल्पाने होतात. उदा. णिट्ठहइ (म्हणजे) निष्टम्भं करोति (असा अर्थ आहे); संदाणइ (म्हणजे) अवष्टम्भं करोति (असा अर्थ आहे).
(सूत्र) श्रमे वावम्फः ।। ६८।। (वृत्ति) श्रमविषयस्य कृगो वावम्फ इत्यादेशो वा भवति। वावम्फइ। श्रमं
करोति। (अनु.) श्रमविषयक कृ (या धातू) ला वावम्फ असा आदेश विकल्पाने होतो.
उदा. वावम्फइ (म्हणजे) श्रमं करोति (असा अर्थ आहे).
(सूत्र) मन्युनौष्ठमालिन्ये णिव्वोल: ।। ६९।। (वृत्ति) मन्युना करणेन यदोष्ठमालिन्यं तद्विषयस्य कृगो णिव्वोल इत्यादेशो
वा भवति। णिव्वोलइ। मन्युना ओष्ठं मलिनं करोति। (अनु.) राग/क्रोध (या) कारणाने (येणारे) जे ओठाचे मालिन्य ते विषय असणाऱ्या
कृ (या धातू) ला णिव्वोल असा आदेश विकल्पाने होतो. उदा. णिव्वोलइ
(म्हणजे) रागाने ओठ मलिन करतो (असा अर्थ आहे). (सूत्र) शैथिल्य-लम्बने पयल्लः ।। ७०।। (वृत्ति) शैथिल्यविषयस्य लम्बनविषयस्य च कृग: पयल्ल इत्यादेशो वा भवति।
पयल्लइ। शिथिलीभवति लम्बते वा। (अनु.) शैथिल्य-विषयक तसेच लम्बनविषयक कृ (या धातू) ला पयल्ल असा
आदेश विकल्पाने होतो. उदा. पयल्लइ (म्हणजे) शिथिल होतो किंवा लोंबतो / लोंबत रहातो (असा अर्थ आहे).