________________
प्राकृत व्याकरणे
२८१
(अनु.) पृथग्भूत आणि स्पष्ट असा कर्तरि अर्थ असता भू (या धातू) ला णिव्वड
असा आदेश होतो. उदा. णिव्वडइ (म्हणजे) पृथक् किंवा स्पष्ट होते असा अर्थ आहे.
(सूत्र) प्रभौ हुप्पो वा ।। ६३।। (वृत्ति) प्रभुकर्तृकस्य भुवो हुप्प इत्यादेशो वा भवति। प्रभुत्वं च प्रपूर्वस्यैवार्थः।
अङ्गे' च्चिअ न पहुप्पइ। पक्षे। पभवेइ। (अनु.) प्रभावी / समर्थ असणे या कर्तरि अर्थी असणाऱ्या भू (या धातू) ला हुप्प
असा आदेश विकल्पाने होतो. प्रभावी असणे हा प्र (उपसर्ग) पूर्वी असणाऱ्या भू धातूचा अर्थ आहे. उदा. अंगे...पहुप्पइ. (विकल्प-) पक्षी :पभवेइ.
(सूत्र) क्ते हू: ।। ६४।। (वृत्ति) भुवः क्तप्रत्यये हूरादेशो भवति। हूअणुहूअं। पहू। (अनु.) भू (धातू) च्या पुढे क्त प्रत्यय असताना (भू ला) हू असा आदेश होतो.
उदा.हूअं...पहूअं. (सूत्र) कृगे: कुणः ।। ६५।। (वृत्ति) कृगः कुण इत्यादेशो वा भवति। कुणइ। करइ। (अनु.) कृ (कृग्) (या धातूला) कुण असा आदेश विकल्पाने होतो. उदा. कुणइ.
(विकल्पपक्षी :-) कुरइ.
(सूत्र) काणेक्षिते णिआरः ।। ६६।। (वृत्ति) काणेक्षितविषयस्य कृगो णिआर इत्यादेशो वा भवति। णिआरइ।
काणेक्षितं करोति। (अनु.) काणेक्षितविषयक कृ (या धातू) ला णिआर असा आदेश विकल्पाने
होतो. उदा. णिआरइ (म्हणजे) काणेक्षितं करोति (असा अर्थ आहे).
१ अंगे एव न प्रभवति।
२ भूत, अनुभूत, प्रभूत.