________________
२६२
तृतीयः पादः
(अनु.) विधि इत्यादि (अर्था) मध्ये उत्पन्न झालेल्या (आणि) बहु (पुष्कळ,
अनेक) या अर्थी असणाऱ्या त्रयांच्या त्रिकांच्या स्थानी अनुक्रमे न्तु, ह, आणि मो असे हे आदेश होतात. उदा. न्तु (चे उदाहरण):- हसन्तु (म्हणजे) हसन्तु किंवा हसेयु: (हसू देत किंवा हसावे असा अर्थ
आहे). ह (चे उदाहरण) :- हसह (म्हणजे) हसत किंवा हसेत (हसा किंवा हसावे असा अर्थ आहे). मो (चे उदाहरण) :- हसामो (म्हणजे) हसाम किंवा हसेम (हसू दे किंवा हसावे असा अर्थ आहे). याचप्रमाणे तुवरन्तु...तुवरामो (अशी रूपे होतात).
(सूत्र) वर्तमाना-भविष्यन्त्याश्च ज ज्जा वा ।। १७७।। (वृत्ति) वर्तमानाया भविष्यन्त्याश्च विध्यादिषु च विहितस्य प्रत्ययस्य
स्थाने ज जा इत्येतावादेशौ वा भवतः। पक्षे यथाप्राप्तम्। वर्तमाना। हसेज हसेज्जा। पढेज पढेजा। सुणेज सुणेजा। पक्षे। हसइ। पढइ। सुणइ। भविष्यन्ती। पढेज पढेजा। पक्षे। पढिहिइ। विध्यादिषु। हसेज्ज हसेज्जा। हसतु हसेद्वा इत्यर्थः। पक्षे। हसउ। एवं सर्वत्र। यथा तृतीयत्रये। अइवाएजा। अइवायावेजा। न समणुजाणामि । न समणुजाणेज्जा वा। अन्ये त्वन्यासामपीच्छन्ति। होज्ज। भवति भवेत् भवतु अभवत् अभूत् बभूव भूयात् भविता
भविष्यति अभविष्यद् वा इत्यर्थः। (अनु.) वर्तमानकाळाचे तसेच भविष्यकाळाचे आणि विधि इत्यादि (अर्था)
मध्ये सांगितलेले जे प्रत्यय त्यांच्या स्थानी ज आणि ज्जा असे हे आदेश विकल्पाने होतात. (विकल्प-) पक्षी:-नेहमीचे प्रत्यय होतातच. उदा. वर्तमानकाळ:- हसेज्ज...सुणेज्जा; (विकल्प-) पक्षी:हसइ...सुणइ. भविष्यकाळ:- पढेज, पढेज्जा; (विकल्प-) पक्षी:पढिहिइ. विधि इत्यादिमध्ये:- हसेज, हसेज्जा (म्हणजे) हसतु किंवा हसेत् असा अर्थ आहे; (विकल्प-) पक्षी:- हसउ. याचप्रमाणे सर्व
१ पठ्
२ श्रु (सुण)
३ अतिपत्
४ समनुज्ञा