________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
२६१
तुमं । हसामु अहं । पेच्छउ । पेच्छसु । पेच्छामु । दकारोच्चारणं भाषान्तरार्थम् ।
(अनु.) विधि इत्यादि अर्थांमध्ये उत्पन्न झालेल्या (आणि) एकत्व या अर्थी असणाऱ्या त्र्यांच्या त्रिकांच्या स्थानी अनुक्रमे दु, सु आणि मु असे हे आदेश होतात. उदा. हसउ...पेच्छामु . (दु मध्ये) दकाराचे उच्चारण हे दुस-या (म्हणजे शौरसेनी) भाषेसाठी आहे.
( सूत्र ) सोर्हिर्वा ।। १७४।।
(वृत्ति) पूर्वसूत्रविहितस्य सो: स्थाने हिरादेशो वा भवति। देहि। देसु। (अनु.) मागील (३.१७३) सूत्रात सांगितलेल्या सु (या आदेशा) च्या स्थानी हि असा आदेश विकल्पाने होतो. उदा. देहि, देसु.
( सूत्र ) अत इज्जस्विज्जहीजे - लुको वा ।। १७५ ।।
(वृत्ति) अकारात्परस्य सो: इज्जसु इज्जहि इज्जे इत्येते लुक् च आदेशा वा भवन्ति। हसेज्जसु । हसेज्जहि । हसेज्जे । हस । पक्षे। हससु । अत इति किम् ? होसु । ठाहि।
(अनु.) (अकारान्त धातूच्या अन्त्य) अकाराचे पुढील सु (या आदेशा) चे इज्जसु, इज्जहि, इज्जे असे हे (तीन) आणि लोप असे आदेश विकल्पाने होतात. उदा. हसेज्जसु...हस. (विकल्प-) पक्षी:- हसमु. अकाराचे (पुढील) असे का म्हटले आहे ? ( कारण इतर स्वरापुढील सु चे इज्जसु इत्यादि आदेश होत नाहीत. उदा. ) होसु, ठाहि.
१ त्वर्
( सूत्र ) बहुषु न्तु ह मो ।। १७६।।
(वृत्ति) विध्यादिषूत्पन्नानां बहुष्वर्थेषु वर्तमानानां त्रयाणां त्रिकाणां स्थाने यथासंख्यं न्तु ह मो इत्येते आदेशा भवन्ति । न्तु। हसन्तु, हसन्तु हसेयुर्वा। ह। हसह, हसत हसत वा । मो। हसामो, हसाम हसेम वा । एवम्। तुवरन्तुः तुवरह तुवरामो ।