________________
२५६
तृतीयः पादः
आदेश होतात. उदा. हसीअइ... होइज्जइ. बहुलचा अधिकार असल्यामुळे क्वचित् क्य (=य) सुद्धा विकल्पाने लागतो. उदा. मए...अच्छीअइ.
( सूत्र ) दृशिवचेर्डीस डुच्छं ।। १६१ ।।
(वृत्ति) दृशेर्वचेश्च परस्य क्यस्य स्थाने यथासङ्ख्यं डीस डुच्च इत्यादेशौ भवतः। ईअइज्जापवादः । दीसइ । वुच्चइ ।
(अनु.) दृश् आणि वच् (या धातूं) च्या पुढील क्य ( प्रत्यया) च्या स्थानी अनुक्रमे डीस (डित् ईस) आणि डुच्च (डित् उच्च) असे आदेश होतात. (क्य प्रत्ययाचे) ईअ आणि इज्ज ( असे आदेश ) होतात. या नियमाचा (सू.३.१६०) प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. दीसइ, वुच्चइ.
( सूत्र ) सी ही हीअ भूतार्थस्य ।। १६२ ।।
(वृत्ति) भूतेऽर्थे विहितोऽद्यतन्यादिः प्रत्ययो भूतार्थ: तस्य स्थाने सी ही हीअ इत्यादेशा भवन्ति। उत्तरत्र व्यञ्जनादीअ - विधानात् स्वरान्तादेवायं विधि:। कासी' काही काहीअ । अकार्षीत् अकरोत् चकार वेत्यर्थः। एवं ठासी ठाही ठाहीअ । आर्षे । देविन्दो र इणमब्बवी इत्यादौ सिद्धावस्थाश्रयणाद् ह्यस्तन्या: प्रयोगः ।
(अनु.) भूतकाळाच्या अर्थी सांगितलेला (जो ) अद्यतनी इत्यादि प्रत्यय तो भूतकाळाचा (प्रत्यय होय ) ; त्याच्या स्थानी सी, ही, आणि हीअ असे आदेश होतात. पुढल्या सूत्रात (३.१६३ ) ( व्यञ्जनान्त धातूच्या अन्त्य ) व्यंजनापुढे ईअ (असा प्रत्यय) सांगितला असल्यामुळे स्वरान्त धातूच्या बाबतीत हा (प्रस्तुतचा) नियम आहे (असे जाणावे). उदा. कासी...काहीअ (म्हणजे) अकार्षीत् अकरोत् किंवा चकार असा अर्थ आहे. याचप्रमाणे :ठासी...ठाहीअ. आर्ष प्राकृतात देविंदो इणमब्बवी इत्यादि ठिकाणी सिद्धावस्थेतील (रूपांचा ) आधार असल्याने ह्यस्तनीचा उपयोग (केलेला दिसतो).
१ कृ
२ देवेन्द्रः इदं अब्रवीत् ।