________________
प्राकृत व्याकरणे
२५५
(अनु.) वर्तमानकाळाचे प्रत्यय आज्ञार्थाचे प्रत्यय आणि शतृ प्रत्यय पुढे असताना
(धातूच्या अन्त्य) अकाराच्या स्थानी एकार विकल्पाने होतो. उदा. वर्तमानकाळाचे प्रत्यय (पुढे असता) :- हसेइ...हसिमु. आज्ञार्थाचे प्रत्यय (पुढे असता) :- हसेउ...सुणउ. शतृ (प्रत्यय पुढे असता) :- हसेन्तो, हसन्तो. क्वचित् (अन्त्य अ चा ए होत नाही. उदा.) जयइ. क्वचित् (अ चा) आ सुद्धा होतो. उदा. सुणाउ.
(सूत्र) जाजे ।। १५९।। (वृत्ति) ज्जा ज इत्यादेशयोः परयोरकारस्य एकारो भवति। हसेज्जा हसेज्ज।
अत इत्येव। होज्जा होज। (अनु.) ज्जा आणि ज्ज हे आदेश (-रूप प्रत्यय) पुढे असता (धातूच्या अन्त्य)
अकाराचा एकार होतो. उदा. हसेज्जा, हसेज. अ चाच (एकार होतो; इतर स्वरांचा एकार होत नाही. उदा.) होज्जा, होज्ज.
(सूत्र) ईअइज्जौ क्यस्य ।। १६०।। (वृत्ति) चिजिप्रभृतीनां भावकर्मविधिं वक्ष्यामः। येषां तु न वक्ष्यते तेषां
संस्कृतातिदेशात्प्राप्तस्य क्यस्य स्थाने ईअ इज्ज इत्येतावादेशौ भवतः। हसीअइ हसिज्जइ। हसीअन्तो हसिज्जन्तो। हसीअमाणो हसिज्जमाणो। पढीअइ पढिज्जइ। होईअइ होइज्जइ। बहुलाधिकारात् क्वचित् क्योऽपि विकल्पेन भवति। मए नवेज। मए नविजेज। तेण लहेज। तेण
लहिज्जेज। तेण अच्छेज्ज। तेण अच्छिज्जेज। तेण अच्छीअइ। (अनु.) चि,जिइत्यादि (धातूं) च्या भावकर्मरूपांचा विचार आम्ही पुढे (सूत्र
४.२४१-२४३) सांगणार आहोत. परंतु ज्या (धातूं) च्या बाबतीत (हा भाग) सांगितला जाणार नाही त्यांच्या बाबतीत संस्कृतमधून अतिदेशाने प्राप्त झालेल्या क्य (या प्रत्यया) च्या स्थानी ईअ आणि इज्ज असे हे
१ नम्
२ लभ्
३ अच्छसाठी सू.४.२१५ पहा.
A-Proof