________________
प्राकृत व्याकरणे
२५३
(आ) होऊ नये म्हणून. अ चा (आ होतो) असे का म्हटले आहे ? (कारण इतर स्वर आदि असल्यास आ होत नाही. उदा.) दूसेइ. पण (णि प्रत्ययाचे) आवे आणि आवि हे आदेश झालेले असतानाही (धातूतील)
आदि अ चा आ होतो असे काही (वैयाकरण) मानतात. (मग त्यांच्या मते) कारावेइ; हासाविओ जणो सामलीए (असे होईल).
(सूत्र) मौ वा ।। १५४।। (वृत्ति) अत आ इति वर्तते। अदन्ताद्धातोर्मों परे अत आत्वं वा भवति।
हसामि हसमि। जाणामि जाणमि। लिहामि लिहमि। अत इत्येव।
होमि। (अनु.) अत आ' (अ चा आ होतो) हे शब्द (या सूत्रात ३.१५३ वरून अनुवृत्तीने)
आहेतच. अकारान्त धातूच्या पुढे मि (हा प्रत्यय) असता (धातूच्या अन्त्य) अ चा आ विकल्पाने होतो. उदा. हसामि...लिहमि. अ चाच (आ होतो; इतर अन्त्य स्वरांचा आ होत नाही. उदा. ) होमि.
(सूत्र) इच्च मोमुमे वा ।। १५५।। (वृत्ति) अकारान्ताद्धातोः परेषु मोमुमेषु अत इत्वं चकाराद् आत्वं च वा
भवतः। भणिमो भणामो। भणिमु भणामु। पक्षे। भणमो। भणमु। भणम। वर्तमानापञ्चमीशतृषु वा (३.१५८) इत्येत्वे तु भणेमो भणेमु
भणेम। अत इत्येव। ठामो। होमो। (अनु.) अकारान्त धातूच्या पुढे मो, मु आणि म (हे प्रत्यय) असताना (धातूतील
अन्त्य) अ चा इ आणि (सूत्रातील) चकारामुळे आ असे विकल्पाने होतात. उदा. भणिमो...भणाम. (विकल्प-) पक्षी:- भणमो...भणम. 'वर्तमाना...वा' या सूत्रानुसार (अकारान्त धातूच्या अन्त्य अ चा) ए झाला असता भणेमो...भणेम (अशी रूपे होतात). (अन्त्य) अ चाच (आ होतो; इतर अन्त्य स्वरांचा आ होत नाही. उदा. ) ठामो, होमो.
१ लिख्
२ भू
A-Proof