________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
(अनु.) ति इत्यादि (धातूंना लागणाऱ्या) प्रत्ययासह अस् (धातू) च्या स्थानी अत्थि असा आदेश होतो. उदा. अत्थि... अम्हे.
२५१
( सूत्र ) णेरदेदावावे ।। १४९।।
(वृत्ति) णे: स्थाने अत् एत् आव आवे एते चत्वार आदेशा भवन्ति । दरिसइ । कारेइ। करावइ। करावेइ । हासेइ हसावइ हसावेइ। उवसामेइ उवसमावइ उवसमावेइ। बहुलाधिकारात् क्वचिदेन्नास्ति। जाणावेइ३। क्वचिद् आवे नास्ति। पाएइ ४ । भावेइ' ।
(अनु.) णि ( या प्रत्यया) च्या स्थानी अ, ए, आव आणि आवे (असे) हे चार आदेश होतात. उदा. दरिस इ... उवसमावेइ. बहुलचा अधिकार असल्यामुळे क्वचित् ए (हा आदेश) होत नाही. उदा. जाणावेइ. क्वचित् आवे (हा आदेश) होत नाही. उदा. पाएइ, भावेइ.
( सूत्र ) गुर्वादेरविर्वा ।। १५०।।
(वृत्ति) गुर्वादेर्णे: स्थाने अवि इत्यादेशो वा भवति । शोषितं सोसविअं सोसिअं । तोषितं तोसविअं तोसिअं ।
(अनु.) दीर्घ स्वर आदि ( स्थानी) असणाऱ्या (धातू) ना लागणाऱ्या णि (या प्रत्यया) च्या स्थानी अवि असा आदेश विकल्पाने होतो. उदा. शोषितम्...तोसिअं.
( सूत्र ) भ्रमेराडो वा ।। १५१।।
(वृत्ति) भ्रमः परस्य णेराड आदेशो वा भवति । भमाडइ भमाडे । पक्षे । भामेइ भमावइ भमावेइ ।
(अनु.) भ्रम् (या धातू) च्या पुढील णि (या प्रत्यया) ला आड असा आदेश विकल्पाने होतो. उदा. भमाडइ... भमावेइ.
३ जाण हा ज्ञा धातूचा आदेश आहे (सू.४.७ पहा).
१ दृश्
४ पा
२ उपशम्
५ भू