________________
२५०
तृतीयः पादः
सि. सि (या आदेशा) सह असे का म्हटले आहे ? (कारण सि हा आदेश नसून) से हा आदेश असताना अत्थि तुमं (असे होते).
(सूत्र) मिमोमैर्हिम्होम्हा वा ।। १४७।। (वृत्ति) अस्तेर्धातो: स्थाने मि मो म इत्यादेशैः सह यथासंख्यं म्हि म्हो म्ह
इत्यादेशा वा भवन्ति। एस म्हि। एषोस्मीत्यर्थः। गय? म्हो। गय म्ह। मुकारस्याग्रहणात् प्रयोग एव न तस्येत्यवसीयते। पक्षे अत्थि अहं। अत्थि अम्हे। अत्थि अम्हो। ननु च सिद्धावस्थायां पक्ष्मश्मष्मस्ममा म्हः (२.७४) इत्यनेन म्हादेशे म्हो इति सिद्धति। सत्यम्। किं तु विभक्तिविधौ प्राय: साध्यमानावस्थाङ्गीक्रियते। अन्यथा वच्छेण
वच्छेसु सव्वे जे ते के इत्याद्यर्थं सूत्राण्यनारम्भणीयानि स्युः। (अनु.) अस् धातूच्या स्थानी, मि, मो आणि म या आदेशांसह अनुक्रमे म्हि, म्हो
आणि म्ह असे आदेश विकल्पाने होतात. उदा. एस म्हि (म्हणजे) एषः अस्मि (हा मी आहे) असा अर्थ होतो; गय...म्ह. सूत्रात मुकार (या आदेशा) चा निर्देश नसल्यामुळे (त्याचा) वापर (प्रयोग) असतच नाही, असे कळून येते. (विकल्प-) पक्षी:- अत्थि...अम्हो. (शंका-) ‘पक्ष्म...म्हः' (२.७४) या सूत्रानुसार (स्म: या रूपाच्या) सिद्धावस्थेत म्ह असा आदेश झाला असता म्हो हे रूप सिद्ध होते असे नाही का म्हणता येत ? (उत्तर-) हे खरे आहे. तथापि प्रत्यय लावून (होणा-या रूपांचे) नियम सांगताना, प्रायः (शब्दाची) साध्यमान अवस्था स्वीकारली जाते; नाहीतर (म्हणजे तसे न केल्यास) वच्छेण...के इत्यादि रूपांच्या सिद्धीसाठी सूत्रेच सांगावयास नको होती असे होईल.
(सूत्र) अत्थिस्त्यादिना ।। १४८।। (वृत्ति) अस्ते: स्थाने त्यादिभिः सह अत्थि इत्यादेशो भवति। अत्थि सो।
अत्थि ते। अत्थि तुमं। अत्थि तुम्हे। अत्थि अहं। अत्थि अम्हे।
१ गताः स्मः।