________________
प्राकृत व्याकरणे
२४९
(अनु.) धातूंना लागणाऱ्या परस्मैपद आणि आत्मनेपद प्रत्ययांतील तृतीय त्रयाशी
संबंधित असणाऱ्या बहु (अनेक) वचनाच्या स्थानी मो, मु आणि म असे हे आदेश होतात. उदा. हसामो...तुवराम.
(सूत्र) अत एवैच् से ।। १४५।। (वृत्ति) त्यादेः स्थाने यौ एच् से इत्येतावादेशावुक्तौ तावकारान्तादेव भवतो
नान्यस्मात्। हसए हससे। तुवरए तुवरसे। करए' करसे। अत इति किम् ? ठाइ२ ठासि। वसुआइ३ वसुआसि। होइ होसि। एवकारोकारान्ताद् एच् से एव भवत इति विपरीतावधारणनिषेधार्थः।
तेनाकारान्ताद् इच् सि इत्येतावपि सिद्धौ। हसइ हससि। वेवइ वेवसि। (अनु.) धातूंना लागणाऱ्या प्रत्ययांच्या स्थानी (वर सू.३.१३९-१४० मध्ये) जे
एच् आणि से असे हे (दोन) आदेश सांगितले ते फक्त अकारान्त धातूंच्या पुढेच होतात इतर (स्वरान्त धातूं) च्या पुढे होत नाहीत. उदा. हसए...करसे. अकारान्त धातूंच्या (पुढे) असे का म्हटले आहे ? (कारण इतर स्वरान्त धातूपुढे हे आदेश होत नाहीत. उदा.) ठाइ...होसि. अकारान्त धातू पुढेच एच आणि से (हे आदेश) होतात अशा विपरीत (चुकीच्या) निश्चयाचा (अवधारण) निषेध करण्यास (सूत्रामध्ये अत: या शब्दापुढे) एवकार (एव हा शब्द) वापरलेला आहे. त्यामुळे अकारान्त धातू पुढेही इच् आणि सि हे दोन्ही (आदेश) सुद्धा सिद्ध होतात. उदा. हसइ...वेवसि.
(सूत्र) सिनास्ते: सिः ।। १४६।। (वृत्ति) सिना द्वितीयत्रिकादेशेन सह अस्ते: सिरादेशो भवति। निठुरो५ जं
सि। सिनेति किम् ? सेआदेशे सति अत्थि तुमं। (अनु.) (धातूंना लागणाऱ्या प्रत्ययांतील) द्वितीय त्रिकांतील (आद्य वचनाच्या)
___सि या आदेशासह अस् (धातू) ला सि असा आदेश होतो. उदा. निट्ठरो जं
१ कृ ४ भू
२ स्था ३ वसुआ हा उद्+वा धातूचा आदेश आहे (सू.४.११ पहा). ५ निष्ठुर: यद् असि।
A-Proof