________________
(२४)
अपभ्रंशाचे अनेक उपप्रकार सांगितले गेले आहेत. नमिसाधूने उपनागर, आभीर आणि ग्राम्य या प्रकारांचा उल्लेख केला आहे. अपभ्रंशाचे सत्तावीस उपप्रकार आहेत या मताचा निर्देश मार्कंडेयाने केला आहे; पण तो स्वत: मात्र नागर, वाचड आणि उपनागर हे तीनच प्रकार मानतो. हेमचंद्राने मात्र अपभ्रंशाचे कोणतेच प्रकार सांगितलेले नाहीत.
मार्कंडेयाने सांगितलेले नागर अपभ्रंश व हेमचंद्राने वर्णिलेले अपभ्रंश यांचा निकट संबंध राजस्थान व गुजरात यांमधील अपभ्रंशाशी अधिक दिसतो.
अपभ्रंश फार भव्य आहे असे राजशेखराचे मत आहे.
प्राकृतभाषा आणि मराठी
मराठी ही एक आधुनिक आर्य भारतीय भाषा आहे. तिच्या उगमाविषयी अनेक मतमतांतरे आहेत. माहाराष्ट्री वा माहाराष्ट्री अपभ्रंश यांतून मराठीचा उद्भव झाला या एका मताचा उल्लेख मागे आलेला आहे. मराठीच्या उगमाविषयी कोणतेही मत खरे असो. एक गोष्ट जाणवते की मराठीवर अनेक प्राकृत भाषांचा प्रभाव पडलेला आहे. म्हणून प्रस्तुत ग्रंथात जाता-जाता ठिकठिकाणी मराठी उदाहरणे निर्दिष्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
प्रस्तुत पुस्तकातील मांडणी
प्रस्तुत पुस्तकाची मांडणी पुढील पद्धतीने केलेली आहे :(अ) प्रथम हेमचंद्राचे मूळ सूत्र व त्याचा अनुक्रमांक, नंतर त्यावरील त्याची संस्कृत ‘वृत्ति' आणि मग वृत्तीचे मराठी भाषांतर दिले आहे. एकाद्या अक्षरावरील "ही खूण त्यातील स्वराचे हस्वत्व दाखविण्यास असून, अक्षरावरील ही खूण सानुनासिक उच्चार दाखविते. वृत्तीमध्ये पद्यात्मक उदाहरणे असल्यास, त्यांना त्या त्या सूत्राखाली एक, दोन इत्यादी अनुक्रमांक दिले आहेत.
२
सिन्धुदेशोद्भवो वाचडोऽपभ्रंशः। मार्कंडेय नागर व वाचड अपभ्रंशांचा संकर म्हणजे उपनागर अपभ्रंश होय (अनयोर्यत्र साङ्कर्यं तदिष्टमुपनागरम्। मार्कंडेय) सुभव्योऽपभ्रंशः। राजशेखर
३