________________
(२३)
जी अपभ्रष्टता ती अपभ्रंश, असे पतंजलीला' म्हणावयाचे आहे. भामहाने केलेल्या अपभ्रंशाच्या उल्लेखावरून२, अपभ्रंश शब्दाच्या अर्थावर फारसा प्रकाश पडत नाही. दंडीने अपभ्रंश शब्दाचे दोन अर्थ सांगितलेले आहेत :१) काव्यामध्ये आभीर, इत्यादींची भाषा म्हणजे अपभ्रंश; २) परंतु शास्त्रात मात्र अपभ्रंश म्हणजे संस्कृतेतर भाषा.
रुद्रट म्हणतो - देशविशेषादपभ्रंशः।४ तर त्या त्या देशातील शुद्ध भाषा म्हणजे अपभ्रंश असे वाग्भट्टाचे म्हणणे आहे.
राजशेखर सांगतो की मरु (मारवाड), टक्क आणि भादानक या प्रदेशातील भाषा- प्रयोग अपभ्रंशमिश्रित आहेत. तर गुर्जर लोकांना अपभ्रंशाने आनंद होतो, असे भोज७ म्हणतो.
प्राकृत भाषांची अंतिम अवस्था म्हणजे अपभ्रंश असे म्हणता येईल. भारताच्या भिन्न भिन्न भागांत या अपभ्रंश प्रचलित असाव्यात. मुख्य मुख्य प्राकृताची अपभ्रंश असावी असे म्हटले जाते. उदा. माहाराष्ट्रीची अपभ्रंश होती; व तिच्यापासून आधुनिक मराठी निघाली असे म्हणतात. पण या माहाराष्ट्री अपभ्रंशाचे कोणतेच वाङ्मय आज उपलब्ध नाही.
विक्रमोर्वशीय नाटक, प्राकृतव्याकरणग्रंथ यांमध्ये अपभ्रंशाची उदाहरणे आहेत. याखेरीज भविस्सयत्तकहा, करकण्डचरिउ इत्यादी अपभ्रंशातील अनेक ग्रंथही उपलब्ध आहेत.
१
भूयांसोपशब्दा अल्पीयांस: शब्दा इति। एकैकस्य हि शब्दस्य बहवोऽपभ्रंशाः, तद् यथा- गौरित्यस्य शब्दस्य गावी गोणी गोता गोपोतालिका इत्यादयो बहवोऽपभ्रंशाः। पतञ्जलि शब्दार्थों सहितौ काव्यं गद्यं पद्यं च तद् द्विधा। संस्कृतं प्राकृतं चान्यदपभ्रंश इति त्रिधा।। भामह आभीरादिगिर: काव्येष्वपभ्रंशतया स्मृताः। शास्त्रे तु संस्कृतादन्यदपभ्रंशतयोदितम्।। दण्डिन् यावरील टीकेत 'प्राकृतमेवापभ्रंशः' असे नमिसाधु सांगतो. अपभ्रंशस्तु यच्छुद्धं तत्तद्देशेषु भाषितम्। वाग्भट्ट सापभ्रंशप्रयोगाः सकलमरुभुवष्टक्कभादानकाश्च। राजशेखर अपभ्रंशेन तुष्यन्ति स्वेन नान्येन गुर्जराः। भोज
५ ६ ७