________________
(२२)
शिलालेख, अश्वघोष व कालिदास यांची नाटके मृच्छकाटिकादि नाटके व प्राकृत व्याकरणे यांमध्ये मागधीची उदाहरणे आढळतात.
पैशाची
वाग्भट पैशाचीला ‘भूतभाषित' म्हणतो. गुणाढ्याची बृहत्कथा - जी सध्या अनुपलब्ध आहे, पैशाची भाषेत होती असे म्हटले जाते. पैशाचीची इतर उदाहरणे प्राकृत व्याकरणांत, हेमचंद्राचे कुमारपालचरित व काव्यानुशासन, मोहपराजय नावाचे नाटक व काही षड्भाषास्तोत्रे यांमध्ये दिसून येतात.
भूतपिशाच, राक्षस, काही नीच पात्रे यांच्यासाठी पैशाचीचा वापर सांगितला गेला आहे.
पिशाच देशातील भाषा ती पैशाची असे लक्ष्मीधर सांगतो. पण हे पिशाच देश कोणते ? याबद्दल मात्र मतभेद आहेत.
पैशाचीचे अकरा उपप्रकार आहेत या मताचा निर्देश मार्कंडेय करतो; पण तो स्वतः मात्र कैकेय, शौरसेन व पांचाल हे पैशाचीचे फक्त तीन प्रकार मानतो.
चुलिका पैशाची
हेमचंद्र व लक्ष्मीधर यांनी या भाषेची म्हणून जी वैशिष्ट्ये दिली आहेत ती इतर वैयाकरणांनी पैशाचीचीच वैशिष्ट्ये म्हणून सांगितली आहेत. तसेच अभिधानचिन्तामणि या आपल्या ग्रंथात हेमचंद्रही चूलिका पैशाचीचा स्वतंत्र भाषा म्हणून निर्देश करीत नाही. तेव्हा चूलिका पैशाची ही स्वतंत्र भाषा नसून, पैशाचीचा उपप्रकार आहे असे मानण्यास हरकत नाही. हेमचंद्राचे कुमारपालचरित व काव्यानुशासन, हम्मीरमदमर्दन नाटक यांमध्ये या उपभाषेची उदाहरणे सापडतात.
अपभ्रंश
अपभ्रंश या शब्दाची वेगवेगळी स्पष्टीकरणे पूर्वग्रंथांत आढळतात. अपभ्रंश शब्दाचा सर्वात प्राचीन उपयोग पतंजलीच्या महाभाष्यात आहे. संस्कृतच्या दृष्टीने