________________
(२१)
भाषेत ती परिणत होई, असेही जैनागम सांगतात. ही अतिशयोक्ति मानली तरी तिच्या बुडाशी पुढील गोष्ट असावी :- महावीरांची मातृभाषा मागधी होती. आपला धर्मोपदेश सर्वांना कळावा म्हणून त्यांनी इतर अनेक प्राकृतांची वैशिष्ट्ये आपल्या भाषेत समाविष्ट केली असावीत. या म्हणण्याला 'अट्ठारसदेसीभासाणिययं अद्धमागहं' हे जिनदासगणीचे वचन पुष्टिकारक दिसते. त्यामुळे मागधीची अगदी थोडी वैशिष्ट्ये या भाषेत उरली. म्हणूनच बहुधा अभयदेव म्हणतो- 'या मागधी नाम भाषा 'रसोर्लशौ मागध्याम्' इत्यादि लक्षणवती सा असमाश्रितस्वकीयसमग्रलक्षणा अर्धमागधी इति उच्यते।'. हेमचंद्राचे मतही असेच दिसते. कारण तोही म्हणतो - 'यदपि पोरणमद्धमागहभासानिययं हवइ सुत्तं इत्यादिना आर्ष स्य अर्धमागधभाषानियतत्वम् आम्नायि वृद्धैः, तदपि प्रायः अस्यैव विधानात्, न वक्ष्यमाणलक्षणस्य'. म्हणूनच ‘मागधीचे अर्धे स्वरूप जिच्यात आहे (अर्धं मागध्या:)' ती अर्धमागधी, असे या शब्दाचे स्पष्टीकरण दिले जात असावे. पण इतरांच्या मते, 'अर्ध्या मगध देशात प्रचलित असलेली (अर्धमगधस्य इयम्) ती अर्धमागधी', असा अर्थ आहे. याला अनुकूल असे 'मगहद्धविसयभासाणिबद्धं अद्धमागहम्' हे जिनदासगणीचे वचन आहे. ___ परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या जैनागमांत अर्धमागधीचे जे स्वरूप दिसते ते मागधीपेक्षा माहाराष्ट्रीला फारच जवळचे आहे. क्रमदीश्वर तर म्हणतो की 'माहाराष्ट्रीमिश्रा अर्धमागधी'. म्हणूनच बहुधा हेमचंद्राने अर्धमागधीचे स्वतंत्र विवेचन केलेले नाही.
शौरसेनी
__ शूरसेन देशात निर्माण झालेली व वापरात असणारी ती शौरसेनी भाषा होय. संस्कृत नाटकांमध्ये नायिका व सखी या प्रामुख्याने गद्यात शौरसेनी भाषा वापरतात. संस्कृत नाटकांत आणि प्राकृत व्याकरणांत या भाषेची उदाहरणे सापडतात.
मागधी
ही मगध देशाची भाषा होती. संस्कृत नाटकांत राजाच्या अंत:पुरातील लोक, अश्वपालक, राक्षस, भिक्षु, चेट इत्यादी पात्रे मागधी भाषा वापरीत. अशोकाचे