________________
प्राकृत व्याकरणे
२४५
लद्धो (म्हणजे) धनाने मिळालेला असा अर्थ आहे; चिरस्स मुक्का (म्हणजे) बऱ्याच काळाने सुटलेली असा अर्थ आहे; तेसि...इण्णं (म्हणजे) त्यांनी हे आचरले नाही (असा अर्थ आहे); याठिकाणी तृतीया (विभक्ती) च्या स्थानी (षष्ठी विभक्ति आहे). चोरस्स बीहइ (म्हणजे) चोराला भितो असा अर्थ आहे ; इअराई...सहिआण (मध्ये) पादान्ताने सहित असणाऱ्यापेक्षा वेगळी (असा अर्थ आहे); येथे पंचमी (विभक्तीच्या स्थानी षष्ठी विभक्ति आली आहे). पिट्ठीए...भारो; याठिकाणी सप्तमीच्या (स्थानी षष्ठी विभक्ति आलेली आहे).
(सूत्र) द्वितीया-तृतीययोः सप्तमी ।। १३५।। (वृत्ति) द्वितीयातृतीययोः स्थाने क्वचित् सप्तमी भवति। गामे' वसामि।
नयरे न जामि। अत्र द्वितीयायाः। मइ५ वेविरीए मलिआई। तिसुद
तेसु अलंकिआ पुहवी। अत्र तृतीयायाः। (अनु.) द्वितीया आणि तृतीया यां (विभक्ती) च्या स्थानी क्वचित् सप्तमी (विभक्ति)
येते. उदा. गामे..जामि; येथे द्वितीयेच्या (स्थानी सप्तमी आली आहे). मइ...पुहवी; येथे तृतीयेच्या (स्थानी सप्तमी आली आहे).
(सूत्र) पञ्चम्यास्तृतीया च ।। १३६।। (वृत्ति) पञ्चम्या: स्थाने क्वचित् तृतीयासप्तम्यौ भवतः। चोरेण बीहइ। चोराद्
बिभेतीत्यर्थः। अन्तेउरे रमिउमागओ राया। अन्त:पुराद् रन्त्वागत
इत्यर्थः। (अनु.) पंचमी (विभक्ती) च्या स्थानी क्वचित् तृतीया आणि सप्तमी (विभक्ति)
येतात. उदा. चोरेण बीहइ (म्हणजे) चोराला भितो असा अर्थ आहे. अंतेउरे...राया (म्हणजे) अन्त:पुरातून (राजा) रमून आला असा अर्थ आहे.
१ ग्राम २ वस् ५ मया वेपनशीलया मृदितानि। ७ राजन्
३ नगर ४ या (जाणे) ६ त्रिभिः तैः अलंकृता पृथ्वी।
A-Proof