________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
२४१
:
(अनु.)(आतापर्यंत) सांगितलेल्याखेरीज (उरलेला) इतर (रूपविचार म्हणजे ) शेष ; त्याबाबतीत अकारान्त शब्दाप्रमाणे विभक्तिरूपविचार आहे, असा अतिदेश (या सूत्राने) केला जात आहे. (म्हणजे) आकार, इत्यादींनी अन्त पावणाऱ्या शब्दांच्या बाबतीत पूर्वी (जी रूप, इत्यादि) कार्ये सांगितलेली नाहीत त्या शब्दांच्या बाबतीत, ‘जस्शसोर्लुक्', इत्यादि अकारान्त शब्दाधिकारात सांगितलेली कार्ये होतात, असा अर्थ आहे. ( स्पष्ट करायचे झाल्यास: ) त्यामध्ये प्रथम ‘जस्शसोर्लुक् याच्या कार्याचा अतिदेश (पुढीलप्रमाणे होतो) :- माला...पेच्छ वा. 'अमोsस्य' याच्या कार्याचा अतिदेश (पुढीलप्रमाणे) :- गिरिं... पेच्छ. ‘टा-आमोर्णः’ याच्या कार्याचा अतिदेश (असा होतो) :- हाहाण कयं ; मालाण... ..वहूण धणं; टा (या प्रत्यया) च्या बाबतीत मात्र टो णा ( ३.२४) आणि 'टाङस्... ङसे : ' (३.२९) असा विधि (नियम) सांगितलेला आहे. 'भिसो...हिं' (३.७) याच्या कार्याचा अतिदेश ( पुढीलप्रमाणे ) मालाहि...वहूहि कयं; याचप्रकारे सानुनासिक व सानुस्वार हि च्या बाबतीत (अतिदेश होतो). ‘ङसेस्...लुक:’(३.८) याच्या कार्याचा अतिदेश ( पुढीलप्रमाणे होतो):मालाओ...धेणूहिंतो आगओ; (यांमधील) हि आणि लुक् यांचा पुढे (३.१२६-१२७) निषेध केला जाईल. 'भ्यसस्...सुन्तो’(३.९) याच्या कार्याचा अतिदेश (असा :-) मालाहिंतो, मालासुंतो ; हि (या प्रत्यया) चा पुढे (३.१२७) निषेध केला जाईल; याचप्रमाणे गिरीहिंतो इत्यादि (रूपे होतात). ‘ङसः स्स:— याच्या कार्याचा अतिदेश (पुढीलप्रमाणे):गिरिस्स...महुस्स; स्त्रीलिंगी शब्दांच्या बाबतीत मात्र ‘टाङस्ङे:' इत्यादि (नियम) सांगितला आहे. 'डे म्मि ङे:' याच्या कार्याचा अतिदेश (असा:-) गिरिम्मि...महुम्मि ; परंतु डे (प्रत्यया) च्या बाबतीत मात्र पुढे (३.१२८) निषेध केला जाईल; स्त्रीलिंगी शब्दांच्या बाबतीत मात्र 'टाङस्ङे : ' : ' (३.२९) इत्यादि (नियम) सांगितला आहे. ‘जस्...दीर्घः’(३.१२) याच्या कार्याचा अतिदेश ( पुढीलप्रमाणे आहे) :गिरी...गुरूण धणं. ‘भ्यसि वा' याच्या कार्याचा अतिदेश (मात्र) लागू होत नाही; कारण 'इदुतो दीर्घः' असा नित्य नियम सांगितला
-
-