________________
२४२
तृतीयः पादः
आहे. 'टाणशस्येत्' (३.१४) आणि 'भिस्भ्यस्सुपि'(३.१५) यां (दोघां) च्या कार्याच्या अतिदेशाचा पुढे (३.१२९) निषेध केला जाईल.
(सूत्र) न दी? णो ।। १२५।। (वृत्ति) इदुदन्तयोराजस्-शस्ङस्यादेशे णो इत्यस्मिन् परतो दीर्घो न भवति।
अग्गिणो। वाउणो। णो इति किम् ? अग्गी। अग्गीओ। (अनु.) इकारान्त आणि उकारान्त शब्दापुढे अर्थात् जस्, शस् आणि ङसि (या
प्रत्ययां) चा णो हा आदेश असताना (त्यांचा अन्त्य स्वर) दीर्घ होत नाही. उदा. अग्गिणो, वाउणो. (पुढे) णो हा (आदेश) असताना असे का म्हटले आहे ? (कारण पुढे णो हा आदेश नसल्यास अन्त्य स्वर दीर्घ होतो. उदा.) अग्गी, अग्गीओ.
(सूत्र) ङसेलृक् ।। १२६।। (वृत्ति) आकारान्तादिभ्योऽदन्तवत्प्राप्तौ ङसेलृग् न भवति। मालत्तो मालाओ
मालाउ मालाहिन्तो आगओ। एवं अग्गीओ वाऊओ इत्यादि। (अनु.) आकारान्त इत्यादि शब्दांच्या पुढे अकारान्त शब्दाप्रमाणे प्राप्त झालेल्या
ङसि (या प्रत्यया) चा लोप होत नाही. उदा. मालत्तो...आगओ. अशाच प्रकारे अग्गीओ, वाऊओ इत्यादि (रूपे होतात).
(सूत्र) भ्यसश्च हिः ।। १२७।। (वृत्ति) आकारान्तादिभ्योऽदन्तवत्प्राप्तो भ्यसो ङसेश्च हिर्न भवति। मालाहिन्तो
मालासुंतो। एवं अग्गीहिन्तो इत्यादि। मालाओ मालाउ मालाहिन्तो।
एवम् अग्गीओ इत्यादि। (अनु.) आकारान्त इत्यादि शब्दांच्या पुढे अकारान्त शब्दाप्रमाणे प्राप्त झालेला
भ्यस् आणि ङसि (या प्रत्ययां) चा 'हि' होत नाही. उदा. मालाहिंतो मालासुंतो. याचप्रमाणे अग्गीहितो, इत्यादि; मालाओ...मालाहिंतो; याचप्रमाणे अग्गीओ इत्यादि (रूपे होतात).