________________
२२६
तृतीयः पादः
असा अर्थ आहे. सिं गुणा (मध्ये सिं म्हणजे) त्यांचे (पुल्लिंगी) किंवा त्यांचे (स्त्रीलिंगी) असा अर्थ आहे. एतद् (चे आदेश) :- से अहिअं (म्हणजे) एतस्य (याचे) अहित असा अर्थ आहे. सिं गुणा...सीलं (मध्ये) एतेषां (=यांचे) गुण वा शील असा अर्थ आहे. (विकल्प-) पक्षी:इमस्स... एआण. इदम् आणि तद् (या सर्वनामां) चा आम् (या प्रत्यया) सह से असा आदेश होतो असे कुणी एक (वैयाकरण) मानतो.
(सूत्र) वैतदो ङसेस्त्तो त्ताहे ।। ८२।। (वृत्ति) एतदः परस्यः ङसे: स्थाने त्तो ताहे इत्येतावादेशौ वा भवतः। एत्तो
एत्ताहे। पक्षे। एआओ एआउ एआहि एअहिंतो एआ। (अनु.) एतद् (सर्वनामा) च्या पुढील ङसि (या प्रत्यया) च्या स्थानी त्तो आणि
त्ताहे असे हे आदेश विकल्पाने होतात. उदा. एत्तो, एत्ताहे. (विकल्प-) पक्षी:- एआओ...एआ.
(सूत्र) त्थे च तस्य लुक् ।। ८३।। (वृत्ति) एतदस्त्थे परे चकारात् त्तो त्ताहे इत्येतयोश्च परयोस्तस्य लुग् भवति।
एत्थ। एत्तो। एत्ताहे। (अनु.) एतद् (सर्वनामा) च्या पुढे त्थ तसेच (सूत्रातील) चकारामुळे त्तो आणि
त्ताहे (हे आदेश) पुढे असताना (एतद् मधील) त चा लोप होतो. उदा. एत्थ...एत्ताहे.
(सूत्र) एरदीतौ म्मौ वा ।। ८४।। (वृत्ति) एतद एकारस्य ङ्यादेशे म्मौ परे अदीतौ वा भवतः। अयम्मि। ईयम्मि।
पक्षे। एअम्मि। (अनु.) एतद् (सर्वनामा) मधील एकाराचा डी (डित् ई) आदेश झाला असताना
(त्याच्या) पुढे म्मि (हा प्रत्यय) असता त्याचे अ आणि ई विकल्पाने होतात. उदा. अयम्मि, ईयम्मि. (विकल्प-) पक्षी:- एअम्मि.