________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
२२३
चा क होतो. उदा. (विभक्तिप्रत्यय पुढे असता:-) को...केण. त्र (प्रत्यय पुढे असता) : कत्थ. तस् (प्रत्यय पुढे असता) :कओ...
..कदो.
--
( सूत्र ) इदम इम: ।। ७२।।
(वृत्ति) इदमः स्यादौ परे इम आदेशो भवति । इमो इमे । इमं इमे । इमेण ।
स्त्रियामपि। इमा।
(अनु.) विभक्तिप्रत्यय पुढे असता इदम् (सर्व नामा) ला इम आदेश होतो. उदा. इमो...इमेण. स्त्रीलिंगातसुद्धा (इदम् ला इम आदेश होतो. उदा.) इमा.
( सूत्र ) पुंस्त्रियोर्न वायमिमिआ सौ ।। ७३ ।
( वृत्ति) इदम्शब्दस्य सौ परे अयमिति पुल्लिंगे इमिआ इति स्त्रीलिंगे आदेशौ वा भवत:। अहवायंः कयकज्जो । इमिआ वाणिअधूआ। पक्षे। इमो। इमा।
(अनु.) सि हा प्रत्यय पुढे असता इदम् या (सर्वनाम) शब्दाला पुल्लिंगात अयं असा आणि स्त्रीलिंगात इमिआ असा असे आदेश विकल्पाने होतात. उदा. अहवायं...धूआ. (विकल्प - ) पक्षी :- इमो, इमा.
( सूत्र ) स्सिंस्सयोरत् ।। ७४।।
(वृत्ति) इदम: स्सिं स्स इत्येतयोः परयोरद् भवति वा । अस्सिं । अस्स । पक्षे इमादेशोऽपि। इमस्सिं। इमस्स । बहुलाधिकारादन्यत्रापि भवति । एहि । एसु३। आहि। एभिः एषु आभिरित्यर्थः।
(अनु.) स्सिं आणि स्स हे प्रत्यय पुढे असताना इदम् (सर्वनामा) चा अ विकल्पाने होतो. उदा. अस्सिं, अस्स. ( विकल्प - ) पक्षी (सू. ३.७२ नुसार इदम् सर्वनामाला) इम असा आदेशसुद्धा होतो. उदा. इमस्सिं, इमस्स. बहुलचा अधिकार असल्यामुळे इतरत्रसुद्धा (म्हणजे इतर काही प्रत्ययापूर्वी सुद्धा
१ अथवा अयं कृतकार्यः ।
२ इयं वणिक् - दुहिता ।
३ इदम् चा अ झाल्यानंतर सू. ३.१५ नुसार या अ चा ए होऊन ही रूपे झाली आहेत.