________________
२२२
तृतीयः पादः
(प्रत्यया) च्या स्थानी डित् इणा असा आदेश विकल्पाने होतो. उदा. इमिणा...तेण.
(सूत्र) तदो णः स्यादौ क्वचित् ।। ७०।। (वृत्ति) तदः स्थाने स्यादौ परे ण आदेशो भवति क्वचित् लक्ष्यानुसारेण। णं
पेच्छ। तं पश्येत्यर्थः। सोअ अ णं रहवई। तमित्यर्थः। स्त्रियामपि। हत्थुन्नामिअ-मुही णं तिअडा। तां त्रिजटेत्यर्थः। णेण भणिअं। तेन भणितमित्यर्थः। तो३ णेण कर-यल-ट्ठिआ। तेनेत्यर्थः। भणिअंच णाए। तयेत्यर्थः। जेहिं कयं। तैः कृतमित्यर्थः। णाहिं
कयं। ताभिः कृतमित्यर्थः। (अनु.) विभक्तिप्रत्यय पुढे असताना लक्ष्याला (=उदाहरणाला) अनुसरून तद् या
(सर्वनामा) च्या स्थानी ण असा आदेश क्वचित् होतो. उदा. णं पेच्छ (म्हणजे) तं पश्य (त्याला पहा) असा अर्थ आहे; सोअइ...रहुवई (मध्ये णं म्हणजे) तं (त्याला) असा अर्थ आहे. स्त्रीलिंगातसुद्धा (तद् या सर्वनामाला ण असा आदेश होतो. उदा.) हत्थु...तिअडा (मध्ये णं तिअडा म्हणजे) तां त्रिजटा (त्रिजटा तिला) असा अर्थ आहे; णेण भणिअं (म्हणजे) तेन भणितं (त्याने म्हटले) असा अर्थ आहे. तो णेण करयलट्ठिआ (मध्ये णेण म्हणजे) तेन (त्याने) असा अर्थ आहे. भणिअं च णाए (मध्ये णाए म्हणजे) तया (तिने) असा अर्थ आहे. णेहिं कयं (म्हणजे) तैः कृतम् (त्यांनी केले) असा अर्थ आहे. णाहिं कयं (म्हणजे) ताभिः कृतम् म्हणजे त्या स्त्रियांनी केले असा अर्थ आहे.
(सूत्र) किम: कस्त्रतसोश्च ।। ७१।। (वृत्ति) किम: को भवति स्यादौ व्रतसोश्च परयोः। को कं। के के। केण।
त्र। कत्थ। तस्। कओ कत्तो कदो। (अनु.) विभक्तिप्रत्यय तसेच त्र आणि तस् हे (प्रत्यय) पुढे असता किम् (सर्वनामा) १ शोचति च तं रघुपतिः।
२ हस्त-उन्नामित-मुखी तां त्रिजटा। ३ तस्मात् तेन करतलस्थिता।
४ भणितं च तया।