________________
२१८
तृतीयः पादः
सव्वस्सिं सव्वम्मि सव्वत्थ। अन्नस्सिं अन्नम्मि अन्नत्थ। एवं सर्वत्र।
अत इत्येव। अमुम्मि। (अनु.) सर्व इत्यादि अकारान्त सर्वनामांच्या पुढे येणाऱ्या ङि या (प्रत्यया) च्या
स्थानी स्सिं, म्मि आणि त्थ हे आदेश होतात. उदा. सव्वस्सिं...अन्नत्थ. याचप्रमाणे इतर सर्वत्र (म्हणजे इतर अकारान्त सर्वनामांच्या बाबतीत होते). अकारान्त सर्वनामांच्याच (बाबतीत असे होते; कारण इतर स्वरान्त सर्वनामापुढे ङि चे असे आदेश होत नाहीत. उदा.) अमुम्मि.
(सूत्र) न वानिदमेतदो हिं ।। ६०॥ (वृत्ति) इदम्एतद्वर्जितात्सर्वादेरदन्तात्परस्य हिमादेशो वा भवति। सव्वहिं।
अन्नहि। कहिं। जहिं। तहिं। बहुलाधिकारात् किंयत्तद्भ्य: स्त्रियामपि। काहिं। जाहिं। ताहिं। बाहुलकादेव किंयत्तदोस्यमामि (३.३३) इति ङी स्ति। पक्षे। सव्वस्सिं सव्वम्मि सव्वत्थ। इत्यादि स्त्रियां तु पक्षे। काए कीए। जाए जीए। ताए तीए। इदमेतद्वर्जनं किम् ? इमस्सिं।
एअस्सिं। (अनु.) इदम् आणि एतद् (ही सर्वनामे) सोडून इतर सर्व इत्यादि अकारान्त
सर्वनामांच्या पुढे येणाऱ्या ङि या (प्रत्यया) ला हिं असा आदेश विकल्पाने होतो. उदा. सव्वहिं...तहिं. बहुलचा अधिकार असल्यामुळे, किम्, यद्
आणि तद् यांच्या स्त्रीलिंगीरूपांतही (हिं असा आदेश होतो. उदा.) काहि...ताहि. (या) बाहुलकामुळेच ‘किंयत्तदोस्यमामि' सूत्राने सांगितलेला ङी हा प्रत्यय येत नाही. (विकल्प-) पक्षी:- सव्वस्सिं...सव्वत्थ इत्यादि. स्त्रीलिंगात मात्र (विकल्प-) पक्षी:- काए...तीए. इदम् आणि एतद् यांना सोडून असे का (म्हटले आहे) ? (कारण त्यांच्या बाबतीत हिं आदेश होत नाही. उदा.) इमस्सिं, एअस्सिं.
१ अन्य
२ अदस्