________________
प्राकृत व्याकरणे
२०७
(अनु.) सि, अम् आणि आम् हे (प्रत्यय) सोडून इतर विभक्ति प्रत्यय पुढे असता
किम्, यद् आणि तद् यां (सर्वनामां) ना स्त्रीलिंगात ङी हा प्रत्यय विकल्पाने लागतो. उदा. कीओ...कासु. अशाच प्रकारे जीओ...ताओ इत्यादि (रूपे होतात). सि, अम् आणि आम् हे प्रत्यय सोडून असे का म्हटले आहे ? (कारण हे प्रत्यय पुढे असताना स्त्रीलिंगात ङी प्रत्यय लागत नाही.
उदा.) का...ताण. (सूत्र) छाया-हरिद्रयोः ।। ३४।। (वृत्ति) अनयोराप्प्रसंगे नाम्न: स्त्रियां ङीर्वा भवति। छाही छाया। हलद्दी
हलद्दा। (अनु.) छाया आणि हरिद्रा या (दोन शब्दांचे) बाबतीत आप् (हा प्रत्यय) लागण्याचा
प्रसंग असता नामाच्या स्त्रीलिंगात ङी (हा प्रत्यय) विकल्पाने लागतो. उदा. छाही...हलद्दा.
(सूत्र) स्वस्रादेर्डा ।। ३५।। (वृत्ति) स्वस्रादेः स्त्रियां वर्तमानाद् डा प्रत्ययो भवति। ससा। नणन्दा।
दुहिआ। दुहिआहिं। दुहिआसु। दुहिआसुओ। गउआ। (अनु.) स्त्रीलिंगात असणाऱ्या स्वसृ इत्यादि शब्दांना डित् आ (डा) असा प्रत्यय
लागतो. उदा. ससा...गउआ. (सूत्र) ह्रस्वोऽमि ।। ३६।। (वृत्ति) स्त्रीलिंगस्य नाम्नोऽमि परे ह्रस्वो भवति। मालं। नइं। वहुं। हसमाणिं
हसमाणं पेच्छ। अमीति किम्? माला सही वहू। (अनु.) अम् (हा प्रत्यय) पुढे असताना स्त्रीलिंगी नामाचा-(अन्त्य) स्वर ह्रस्व
होतो. उदा. मालं...पेच्छ. अम् (हा प्रत्यय) पुढे असताना असे का म्हटले आहे ? (कारण तो प्रत्यय पुढे नसल्यास नामाचा अन्त्य स्वर ह्रस्व
होत नाही. उदा.) माला...वहू. १ स्वसृ २ ननन्दृ
३ दुहित ४ दुहितृ-सुत ५ गवय
६ नदी
A-Proof