________________
२०६
२.४) इत्याप्। साहणाः । कुरुचरा' ।
(अनु.) 'अणादि' या सूत्राने प्रत्ययाच्या निमित्ताने (म्हणजे प्रत्यय म्हणून ) जो ई (ङी) (हा प्रत्यय) सांगितलेला आहे तो स्त्रीलिंगात असणाऱ्या नामांना विकल्पाने लागतो. उदा. साहणी, कुरुचरी (विकल्प -) पक्षी 'आत् रति’ या सूत्रानुसार (सांगितलेला) आप् (हा प्रत्यय) लागतो. उदा. साहणा, कुरुचरा.
( सूत्र ) अजातेः पुंसः || ३२||
(वृत्ति) अजातिवाचिनः पुल्लिङ्गात् स्त्रियां वर्तमानाद् ङीर्वा भवति । नीली ३ नीला। काली ४ काला । हसमाणी हसमाणा । सुप्पणही 'सुप्पणहा । इमीए इमाए । इमीणं इमाणं । एईए एआए। एईणं एआणं । अजातेरिति किम् ? करिणी । अया । एलया । अप्राप्ते विभाषेयम्। तेन गोरी कुमारी इत्यादी संस्कृतवन्नित्यमेव ङीः ।
तृतीयः पादः
(अनु.) अजातिवाचक पुल्लिंगी शब्दांपासून स्त्रीलिंगात येणाऱ्या ( असणाऱ्या) शब्दांपुढे ई (ङी) हा प्रत्यय विकल्पाने येतो. उदा. नीली...एआणं. अजातिवाचक (पुल्लिंगी शब्दांपासून) असे का म्हटले आहे ? (कारण जर जातिवाचक पुल्लिंगी शब्द असेल तर असे होत नाही. उदा.) करिणी...एलया. (हा प्रत्यय) प्राप्त होत नसताना, हा विकल्प आहे. त्यामुळे गोरी, कुमारी इत्यादि शब्दांत संस्कृतप्रमाणेच नित्य ई (ङी) प्रत्यय लागलेला आहे.
( सूत्र ) किं यत्तदो ऽस्यमामि ।। ३३ ।।
(वृत्ति) सिअम्आमूर्जिते स्यादौ परे एभ्यः स्त्रियां ङीर्वा भवति । कीओ काओ। कीए काए। कीसु कासु । एवं। जीओ जाओ । तीओ ताओ । इत्यादि । अस्यमामीति किम् ? का जा सा । के जं तं । काण जाण ताण ।
१ साधन
५ शूर्पणख
२ कुरुचर
६ करिन्
३ नील
७ अज
४ काल
८ एड/ एल