________________
प्राकृत व्याकरणे
२०५
(अनु.) स्त्रीलिंगात असणाऱ्या नामाच्या पुढील टा, ङस् आणि ङि यां (प्रत्ययां)
च्या स्थानी प्रत्येकी अ, आ, इ आणि ए असे हे चार आदेश त्यांच्या पूर्वीचा (म्हणजे मागील) स्वर दीर्घ होऊन होतात. पण ङसि या (प्रत्यया) च्या बाबतीत मात्र हे (आदेश त्यांच्या) पूर्वीचा (म्हणजे मागील) स्वर दीर्घ होऊन विकल्पाने होतात. उदा. मुद्धाअ...ठिअं वा. (नामाच्या पुढे स्वार्थे) क प्रत्यय लागला असताना मात्र (पुढीलप्रमाणे रूपे होतात :-) मुद्धिआअ...कमलिआए. (इतर शब्दांची रूपे:-) बुद्धीअ...वहूए...ठिअंवा. ङसि (प्रत्यया) च्या बाबतीत मात्र (हे आदेश) विकल्पाने होतात. उदा. मुद्धाअ...वहूए आगओ. (विकल्प-) पक्षी :मुद्धाओ...धेहितो, इत्यादि. 'शेषेऽदन्तवत्' या सूत्राने विहित केलेल्या अतिदेशामुळे, ‘जस्...दीर्घः' या सूत्राने येणारे दीर्घत्व विकल्प-पक्षी सुद्धा होते. स्त्रीलिंगात असणाऱ्याच (नामाच्या पुढील टा, इत्यादि प्रत्ययांच्या स्थानी अ इत्यादि आदेश येतात; अन्य लिंगी नामाच्या पुढे होत नाहीत. उदा.) वच्छेण...वच्छाओ, टा, इत्यादि (म्हणजे टा, ङस् आणि ङि यां) च्या (स्थानी अ, इत्यादि आदेश होतात) असे का म्हटले आहे ? (कारण हे प्रत्यय नसतील तर असे आदेश होत नाहीत. उदा.) मुद्धा...वहू.
(सूत्र) नात आत् ।। ३०।। (वृत्ति) स्त्रियां वर्तमानादादन्तानाम्नः परेषां टाङस्ङिङसीनामादादेशो न भवति।
मालाअ मालाइ मालाए कयं सुहं ठिअं आगओ वा।। (अनु.) स्त्रीलिंगात असणाऱ्या आकारान्त नामाच्या पुढील टा, ङस्, ङि आणि
ङसि या प्रत्ययांना आ असा आदेश होत नाही. उदा. मालाअ...आगओ
वा. (सूत्र) प्रत्यये ङीर्न वा ।। ३१।। (वृत्ति) अणादिसूत्रेण (हे. २.४) प्रत्ययनिमित्तो यो ङीरुक्तः स स्त्रियां वर्तमानान्नाम्नो वा भवति। साहणी। कुरुचरी। पखे। आत् (हे.
२ कुरुचर
१ साधन
A-Proof