________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
होतात (व त्यावेळी) त्यांच्या पूर्वीचे स्वर दीर्घ होतात. (म्हणजे) हे (आदेश) पुढे असताना, (त्यांच्या) पूर्वीचा (म्हणजे मागील) स्वर दीर्घ होतो असे विधान (येथे) आहे, असा अर्थ होतो. उदा. इँ ( आदेश असताना) :- जाइँ...अम्हे. इं (आदेश असताना) :- • उम्मीलन्ति....मुञ्च वा. णि (आदेश असताना) फुल्लन्ति...जेम वा. याचप्रमाणे मणि (असे रूप होते). नपुंसकलिंगात असणाऱ्याच ( नामांपुढे जस्-शस् चे असे आदेश होतात; इतर लिंगात असणाऱ्या नामापुढे असे आदेश होत नाहीत. उदा.) वच्छा, वच्छे. जस् आणि शस् या प्रत्ययांच्या ( स्थानी ) असे का म्हटले आहे ? ( कारण इतर प्रत्ययांच्या स्थानी असे आदेश होत नाहीत. उदा.) सुहं.
:
( सूत्र ) स्त्रियामुदोतौ वा ।। २७ ।।
(वृत्ति) स्त्रियां वर्तमानान्नाम्नः परयोर्जस् - शसो: स्थाने प्रत्येकम् उत् ओत् इत्येतौ सप्राग्दीर्घौ वा भवतः । वचनभेदो यथासंख्यनिवृत्त्यर्थः । मालाउ' मालाओ। बुद्धीउ बुद्धीओ। सहीउ ? सहीओ। धेणूउ धेणूओ। वहूउ वहूओ। पक्षे। माला। बुद्धी । सही। धेणू। वहू। स्त्रियामिति किम् ? वच्छा। जस्-शस इत्येव । मालाए कयं ।
१ माला
२०३
(अनु.) स्त्रीलिंगात असणाऱ्या नामाच्या पुढील जस् आणि शस् (या प्रत्ययां) च्या स्थानी प्रत्येकी उ आणि ओ असे हे (आदेश) विकल्पाने होतात (व त्यावेळी) त्यांच्या पूर्वीचा (म्हणजे मागील ) स्वर दीर्घ होतो. (आदेशांच्या) अनुक्रमाची निवृत्ति करण्यास वचनभेद आहे. उदा. मालाउ... ..वहूओ. ( विकल्प - ) पक्षी :- माला... वहू. स्त्रीलिंगात असणाऱ्या ( नामाच्या पुढील ) असे का म्हटले आहे ? ( कारण अन्यलिंगी नामापुढे उ आणि ओ होत नाहीत. उदा.) वच्छा. जस् आणि शस् (या प्रत्ययां) च्या स्थानीच ( उ आणि ओ होतात; इतर प्रत्ययांच्या स्थनी होत नाहीत. उदा. ) मालाए कयं.
२ सखी
३ वधू