SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 202
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ A-Proof प्राकृत व्याकरणे चे संदर्भात:- गिरीओ... तरूहिंतो. (या इकारान्त आणि उकारान्त पुल्लिंगी व नपुं.नामांच्या संदर्भात पंचमी एकवचनाच्या ) हि आणि लोप यांचा निषेध (पुढे सू.३.१२६- १२७ पहा) केला जाईल. ङस् चे संदर्भात:गिरिस्स, तरुस्स. ङसि आणि ङस् या प्रत्ययांचा ( णो होतो) असे का म्हटले आहे ? (कारण हे प्रत्यय नसतील तर णो होत नाही. उदा.) गिरिणा.......कयं. पुल्लिंगात आणि नपुंसकलिंगात असणाऱ्या (शब्दाच्या) असे का म्हटले आहे ? ( कारण स्त्रीलिंगी शब्दांच्या बाबतीत असा णो होत नाही. उदा.) बुद्धीअ... समिद्धी वा. इ आणि उ यांच्यापुढे येणाऱ्याच (ङसि व ङस् यांचा णो होतो; इतर स्वरांच्या पुढे येणाऱ्या ङसि व ङस् यांचा णो होत नाही. उदा.) कमलाओ, कमलस्स. २०१ ( सूत्र ) टो णा ।। २४।। ( वृत्ति) पुंक्लीबे वर्तमानादिदुतः परस्य टा इत्यस्य णा भवति । गिरिणा गामणिणाः। खलपुणा तरुणा । दहिणा महुणा । ट इति किम् ? गिरी तरू दहिं महुं । पुंक्लीब इत्येव । बुद्धीअ धेणूअ कयं । इत इत्येव। कमलेण४। (अनु.) पुल्लिंगात व नपुंसकलिंगात असणाऱ्या ( शब्दांच्या अन्त्य अशा ) इ आणि उ यांपुढील टा या (प्रत्यया) चा णा होतो. उदा. गिरिणा ... .. महुणा. टा प्रत्ययाचा (णा होतो) असे का म्हटले आहे ? ( कारण इतर प्रत्ययांचा असा णा होत नाही. उदा ) गिरी...महुं. पुल्लिंगात आणि नपुंसकलिंग (असणाऱ्या इकारान्त व उकारान्त शब्दांच्या बाबतीत टा चा णा होतो, स्त्रीलिंगी शब्दांच्या बाबतीत होत नाही. उदा ) बुद्धीअ... कयं . इ आणि उ यांचेपुढे येणाऱ्याच (टा चा णा होतो; इतर स्वरापुढे येणाऱ्या टा चा णा होत नाही. उदा.) कमलेण. १ ग्रामणी २ खलपू
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy