SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 201
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २०० तृतीयः पादः जस-शसोरिति किम् ? गिरिं। तरूं। इदुत इत्येव। वच्छा। वच्छे । जस् -शसोरिति द्वित्वमिदुत इत्यनेन यथासंख्याभावार्थम् । एवमुत्तरसूत्रेऽपि। (अनु.) इ आणि उ यांच्यापुढे जस् आणि शस् (या प्रत्ययां) चा पुल्लिंगात णो असा आदेश विकल्पाने होतो. उदा. गिरिणो...पेच्छ वा. (विकल्प-) पक्षी :गिरी, तरू. पुल्लिंग असतानाच (असा आदेश होतो; पुल्लिंग नसल्यास, असा आदेश होत नाही. उदा.) दहीइं, मह्इं. जस् व शस् यां (प्रत्ययां) ना (आदेश होतो) असे का म्हटले आहे ? (कारण हे प्रत्यय नसल्यास, असा आदेश होत नाही. उदा.) गिरिं, तरुं, इ आणि उ यांच्या पुढेच (जस्-शस् प्रत्यांना असा आदेश होतो इतर स्वरांपुढे नाही. उदा.) वच्छा, वच्छे. जस् आणि शस् या दोघांना (हा आदेश होतो असे सांगण्याचे कारण असे की) इ पुढे आणि उ पुढे असे म्हटले असल्याने, (हा आदेश) अनुक्रमाने होतो असा अर्थ घेतला जाऊ नये. अशाच प्रकारे (या-) पुढील सूत्रांतही समजावे. (सूत्र) ङसिङसो: पुंक्लीबे वा ।। २३।। (वृत्ति) पुंसि क्ली च वर्तमानादिदुतः परयोङसिङसोर्णो वा भवति। गिरिणो। तरुणो। दहिणो। महणो आगओ विआरो३ वा। पक्षे। उसेः। गिरीओ गिरीउ गिरीहिन्तो। तरूओ तरूउ तरूहिन्तो। हिलुकौ निषेत्स्यते। ङसः। गिरिस्स। तरुस्स। ङसिङसोरिति किम् ? गिरिणा। तरुणा कयं। पुंक्लीब इति किम् ? बुद्धीअ। धेणूअ लद्धं समिद्धी५ वा। इदुत इत्येव। कमलाओ। कमलस्स। (अनु.) पुल्लिंगात आणि नपुंसकलिंगात असणाऱ्या (शब्दांच्या अन्त्य अशा) इ आणि उ यांच्यापुढे येणाऱ्या ङसि आणि ङस् (या प्रत्ययां) चा णो विकल्पाने होतो. उदा. गिरिणो...विआरो वा. (विकल्प-) पक्षी :- ङसि १ तरु २ राजन्ते (सूत्र ४.१०० नुसार राज् धातूचा रेह असा आदेश होतो). ३ विकार ४ लब्ध ५ समृद्धि ६ कमल
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy