SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 198
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ A-Proof प्राकृत व्याकरणे १९७ का म्हटले आहे ? ( कारण मागे इ आणि उ नसल्यास असा दीर्घ होत नाही. उदा.) वच्छेहिं...वच्छेसु. भिस्, भ्यस् व सुप् हे प्रत्यय पुढे असतानाच (मागील इ व उ दीर्घ होतात; इतर प्रत्यय पुढे असल्यास ते दीर्घ होत नाहीत. उदा.) गिरिं... पेच्छ. ( सूत्र ) चतुरो वा ।। १७।। (वृत्ति) चतुर उदन्तस्य भिस्भ्यस्सुप्सु परेषु दीर्घो वा भवति । चऊहि चउहि । चऊओ चउओ। चऊसु चउसु । (अनु.) उकारान्त चतुर् (म्हणजे चउ) शब्दापुढे भिस्, भ्यस् आणि सुप् हे प्रत्यय असताना (मागील उकार) विकल्पाने दीर्घ (म्हणजे ऊ) होतो. उदा. चअहि...चउसु. ( सूत्र ) लुप्ते शसि ।। १८ ।। (वृत्ति) इदुतो: शसि लुप्ते दीर्घो भवति । गिरी । बुद्धी । तरू । धेणू पेच्छ । लुप्त इति किम् ? गिरिणो । तरुणो पेच्छ । इदुत इत्येव। वच्छे पेच्छ। जस्शस (३.१२) इत्यादिना शसि दीर्घस्य लक्ष्यानुरोधार्थो योगः । लुप्त इति तु णवि प्रतिप्रसवार्थशङ्कानिवृत्त्यर्थम् । (अनु.) (पुढे असणाऱ्या) शस् (प्रत्यया) चा लोप झाला असताना (त्याचे मागील) इ आणि उ यांचा दीर्घ (म्हणजे ई आणि ऊ) होतो. उदा. गिरी... पेच्छ. (शस् प्रत्ययाचा) लोप झाला असताना असे का म्हटले आहे ? (कारण शस् चा लोप न होता शस् चा आदेशप्रत्यय पुढे असल्यास, मागील इ व उ दीर्घ होत नाहीत. उदा.) गिरिणो... पेच्छ. (शस् प्रत्ययाचा) लोप झाला असताना मागील इ आणि उ यांचाच (दीर्घ होतो, इतर स्वरांचा नाही. उदा.) वच्छे पेच्छ. ‘जस् - शस' इत्यादि सूत्रानुसार शस् प्रत्यय (पुढे ) असताना उदाहरणांना अनुसरून (दीर्घ व्हावा ) हे सांगण्यासाठी दीर्घ होतो हा (प्रस्तुतचा) नियम आहे. (शस् प्रत्ययाचा) लोप झाला असताना असे म्हणण्याचे कारण मात्र असे की णो या प्रत्ययाच्या (सू. ३.२२ पहा ) बाबतीत प्रतिप्रसव आहे काय अशी शंका येऊ नये म्हणून.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy