________________
प्राकृत व्याकरणे
१९५
त्तोदोदुषु। वृक्षेभ्यः। वच्छत्तो। ह्रस्व: संयोगे (१.४) इति ह्रस्वः। वच्छाओ। वच्छाउ। आमि। वच्छाण। ङसिनैव सिद्धे त्तोदोदुग्रहणं
भ्यसि एत्वबाधनार्थम्। (अनु.) जस्, शस्, ङसि, तो, दो, दु आणि आम् (हे प्रत्यय पुढे) असताना
(त्यांचे मागील) अकाराचा दीर्घ (म्हणजे आकार) होतो. उदा. जस् व शस् (पुढे असता) :- वच्छा. ङसि (पुढे असता) :- वच्छाओ...वच्छा. त्तो, दो आणि दु (पुढे असता) :- वृक्षेभ्यः - वच्छत्तो; (या रूपात जरी च्छ चा च्छा होतो तरी) 'ह्रस्व: संयोगे' सूत्रानुसार (तो आकार) ह्रस्व झाला आहे ; वच्छाओ; वच्छाउ. आम् (पुढे असता) :- वच्छाण. (खरे म्हणजे) ङसि या प्रत्ययाच्या निर्देशाने (त्तो, दो व दु हे प्रत्यय ग्रहण होऊन, सूत्रात त्यांची) सिद्धि झाली असतानाही त्तो, दो आणि दु असा (स्वतंत्र) निर्देश (सूत्रात) केला आहे; कारण (३.१५ सूत्रानुसार) भ्यस् प्रत्यय पुढे असताना होणाऱ्या ए चा (येथे) बाध व्हावा. म्हणून.
(सूत्र) भ्यसि वा ।। १३।। (वृत्ति) भ्यसादेशे परे अतो दीर्घो वा भवति। वच्छाहिन्तो वच्छेहिन्तो।
वच्छासुन्तो वच्छेसुन्तो। वच्छाहि वच्छेहि। (अनु.) भ्यस् (प्रत्यया) चे आदेश पुढे असताना (त्यांचे मागील) अकाराचा दीर्घ
(म्हणजे आ) विकल्पाने होतो. उदा. वच्छाहितो...वच्छेहि.
(सूत्र) टाण-शस्येत् ।। १४।। (वृत्ति) टादेशे णे शसि च परे अस्य एकारो भवति। टाण। वच्छेण। णेति
किम् ? अप्पणा' अप्पणिआ अप्पणइआ। शस्। वच्छे पेच्छ। (अनु.) टा (प्रत्यया) चा आदेश ण आणि शस् (प्रत्यय) हे पुढे असता (त्यांचे
मागील) अकाराचा एकार होतो. उदा. टा चा आदेश ण (पुढे असताना) :- वच्छेण. (टा चा आदेश) ण (हा पुढे असता) असे का
१ आत्मन्च्या रूपांसाठी सू. ३.५६-५७ पहा.
२ वृक्षान् प्रेक्षस्व।
A-Proof