________________
१८८
द्वितीयः पादः
तसेच संभावन या अर्थी वणे असे (हे अव्यय) वापरावे. उदा. वणे देमि (म्हणजे मी) निश्चितपणे देतो. विकल्प दाखविताना:- होइ...होइ (म्हणजे) होते अथवा होत नाही. अनुकम्प्य या अर्थी:- दासो... मुच्चइ (म्हणजे) अनुकेंपनीय ( अशा) दासाचा त्याग कैला जात नाही. संभावन या अर्थी: नत्थि...परिणामो (म्हणजे) हे संभवते असा अर्थ आहे.
( सूत्र ) मणे विमर्शे ।। २०७।।
( वृत्ति) मणे इति विमर्शे प्रयोक्तव्यम् । मणे सूरो। किं स्वित्सूर्यः । अन्ये मन्ये इत्यर्थमपीच्छन्ति।
(अनु.) मणे असे (हे अव्यय) विमर्श या अर्थी वापरावे. उदा. मणे सूरो (म्हणजे हा) सूर्य आहे की काय! (मणे या अव्ययाचा) मन्ये (मला वाटते) असाही अर्थ आहे असे इतर वैयाकरण मानतात.
( सूत्र ) अम्मो आश्चर्ये ।। २०८।।
( वृत्ति) अम्मो इत्याश्चर्ये प्रयोक्तव्यम् । अम्मो कह पारिज्जइ ।
(अनु.) अम्मो असे (हे अव्यय) आश्चर्य दाखविण्यास वापरावे. अम्मो ... ...पारिज्जइ.
१ ( अम्मो) कथं शक्यते ।
२ विशदं विकसन्ति स्वयं ( अप्पणो ) कमलसरांसि ।
३ स्वयं (चेअ) जानासि करणीयम् ।
उदा.
( सूत्र ) स्वयमोऽर्थे अप्पणो न वा ।। २०९।।
(वृत्ति) स्वयमित्यस्यार्थे अप्पणो वा प्रयोक्तव्यम् । विसयं विअसन्ति' अप्पणो कमलसरा । पक्षे। सयं चेअर मुणसि करणिज्जं ।
(अनु.) स्वयं ( शब्दाच्या ) अर्थी अप्पणी हा शब्द विकल्पाने वापरावा.उदा.विसयं.... ... सरा. (विकल्प - ) पक्षी :- सयं... करणिज्जं.