________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
१७३
निज्जिआसोअपल्लविल्लेण;
:
वतनके...प्पेत्तून. (स्वार्थे) इल्ल (प्रत्यय) पुरिल्लो (हा शब्द) पुरः किंवा पुरा ( या शब्दापासून आहे). (स्वार्थे) उल्ल (प्रत्यय) : :- मह...हत्थुल्ला. (विकल्प -) पक्षी :- चंदो... हत्था. पण कुत्सा, इत्यादि विशिष्ट अर्थ सांगावयाचा असताना संस्कृतप्रमाणेच कप् प्रत्यय सिद्ध होतो. यावादिलक्षण असा क (प्रत्यय) ठराविक शब्दांना निश्चितपणे लागतोच असे वचन आहे.
( सूत्र ) ल्लो नवैकाद्वा ।। १६५।।
(वृत्ति) आभ्यां स्वार्थे संयुक्तो लो वा भवति । नवल्लो। एकल्लो। सेवादित्वात् कस्य द्वित्वे एक्लो । पक्षे । नवो। एक्को एओ ।
(अनु.) नव आणि एक या शब्दांपुढे संयुक्त ल ( =ल्ल) हा स्वार्थे प्रत्यय विकल्पाने येतो. उदा. नवल्लो। एकल्लो। (एक हा शब्द ) सेवादि शब्दांत येत असल्याने (सू.२.९९ पहा) क चे द्वित्व झाले असता :- एक्कल्लो. (विकल्प - ) पक्षी नवो...एओ.
-:
( सूत्र ) उपरे : संव्याने ।। १६६ ।।
(वृत्ति) संव्यानेऽर्थे वर्तमानादुपरिशब्दात् स्वार्थे ल्लो भवति । अवरिल्लो। संव्यान इति किम्? अवरिं।
(अनु.) संव्यान ( झाकण, वस्त्र) या अर्थी असणाऱ्या उपरि या शब्दापुढे ल्ल हा प्रत्यय स्वार्थे येतो. उदा. अवरिल्लो. संव्यान या अर्थी असणाऱ्या असे का म्हटले आहे)? (कारण तो अर्थ नसल्यास ल्ल हा स्वार्थे प्रत्यय लागत नाही. उदा.) अवरिं.
( सूत्र ) भ्रुवो मया डमया ।। १६७ ।।
(वृत्ति) भ्रूशब्दात्स्वार्थे मया डमया इत्येतौ प्रत्ययौ भवतः । भुमया । भमया । (अनु.) भ्रू या शब्दापुढे मया आणि अमया ( = डमया) असे हे प्रत्यय स्वार्थे (म्हणून) येतात. उदा. भुमया, भमया.