________________
प्राकृत व्याकरणे
१६९
सोडून इतर प्रत्ययांनी अन्त पावणाऱ्या शब्दांच्या बाबतीत हा प्रत्यय लागतो असा नियम (येथे सांगितला आहे). पीनता या शब्दाचे प्राकृतात पीणया असे (वर्णान्तर) होते. पीणदा हे (वर्णान्तर) मात्र दुसऱ्या (म्हणजे शौरसेनी) भाषेत होते. म्हणून येथे तल् चा दा केलेला नाही.
(सूत्र) अनकोठात्तैलस्य डेल्लः ॥ १५५।। (वृत्ति) अङ्कोठवर्जिताच्छब्दात्परस्य तैलप्रत्ययस्य डेल इत्यादेशो भवति।
सुरहिजलेण' कडुएल्लं। अनङ्कोठादिति किम् ? अङ्कोल्लतेलं। (अनु.) अंकोठ हा शब्द सोडून इतर शब्दांपुढे येणाऱ्या तैल प्रत्ययाला डेल्ल (=एल्ल)
असा आदेश होतो. उदा. सुरहि...एल्लं. अंकोठ शब्द सोडून (इतर शब्दापुढील) असे का म्हटले आहे ? (कारण अंकोठ शब्दापुढे तैल चा डेल्ल असा आदेश होत नाही. उदा.) अंकोल्लतल्लं.
(सूत्र) यत्तदेतदोतोरित्तिअ एतल्लक् च ।। १५६॥ (वृत्ति) एभ्य: परस्य डावादेरतो: परिमाणार्थस्य इत्तिअ इत्यादेशो भवति
एतदो लुक् च। यावत् जित्तिअं। तावत् तित्ति। एतावत् इत्तिअं। (अनु.) यद्, तद् आणि एतद् यांच्यापुढे परिमाण या अर्थी येणाऱ्या डावादि अतु
प्रत्ययाला इत्तिअ असा आदेश होतो आणि एतद् चा लोप होतो. उदा. यावत्...इत्तिअं.
(सूत्र) इदंकिमश्च डेत्तिअडेत्तिलडेदहाः ।। १५७।। (वृत्ति) इदंकिंभ्यां यत्तदेतद्भ्यश्च परस्यातोर्डावतोर्वा डित एत्तिअ एत्तिल
एहह इत्यादेशा भवन्ति एतल्लुके च। इयद् एत्ति एत्तिलं एद्दहं। कियत् केत्तिअं केत्तिलं केद्दह। यावत् जेत्तिअं जेत्तिलं जेद्दह। तावत् तेत्तिअं
तेत्तिलं तेद्दहं। एतावत् एत्तिअं एत्तिलं एद्दहं। (अनु.) इदम् आणि किम् तसेच यद्, तद् आणि एतद् यांच्यापुढे येणाऱ्या अतु
१ सुरभिजलेन कटुतैलम्।
२ अङ्कोठतैलम्।
A-Proof