________________
(१६)
(२) तद्भव (संस्कृतभव) :- जे संस्कृत शब्द काहीतरी फरक होऊन प्राकृतमध्ये येतात, ते तद्भव शब्द. उदा. अग्गि, कसण, पुत्त, मुह इत्यादी. ज्या शब्दांचा संस्कृतशी काही संबंध जोडता येत नाही, असे शब्द. उदा. खोडी, बप्प इत्यादी.
(३) देशी किंवा देश्य :
:
प्राकृतभाषांची स्तुती
:
संस्कृतभाषेपेक्षा प्राकृतभाषा चांगल्या आहेत, असे आपले मत पूर्वीच्या काही लेखकांनी नोंदवून ठेवले आहे. राजशेखर बालरामायणात म्हणतो :प्रकृतिमधुराः प्राकृतगिरः ।, तर शाकुंतलावरील टीकेत शंकर सांगतो संस्कृतात् प्राकृतं श्रेष्ठं ततोऽपभ्रंशभाषणम् । आणि म्हणूनच प्राकृतात रचना करणाऱ्या काहींनी पुढीलप्रमाणे उद्गार काढले आहेत :- प्राकृतकाव्य अमृत आहे (अमिअं पाइअकव्वं । गाथासप्तशती); जगात प्राकृतकाव्य कुणाच्या हृदयाला सुखवीत नाही ? ( पाइयकव्वं लोए कस्स न हिययं सुहावेइ ? नाणपंचमीकहा). कुवलयमालाकार उद्योतन हा संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश यांचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो :- संस्कृत हे 'दुर्जनांच्या हृदयाप्रमाणे विषम' (दुज्जणहिययं पिव विसमं), प्राकृत हे 'सज्जनांच्या वचनाप्रमाणे सुखसंगत वा शुभसंगत' (सज्जणवयणं पिव सुहसंगयं) आणि अपभ्रंश हे 'पणयकुवि - पणइणि-समुल्लाव - सरिसं मणोहरं' (प्रणयात रागावलेल्या प्रणयी स्त्रीच्या बोलण्याप्रमाणे मनोहर) आहे.
हेमचंद्र व त्याची ग्रंथरचना
जैनधर्मीयांत हेमचंद्र ही एक माननीय विभूति होऊन गेली. गतकाळात जे श्रेष्ठ ग्रंथकार होऊन गेले त्यांमध्ये हेमचंद्राचा अंतर्भाव करायला हवा. त्याच्याजवळ तीव्र बुद्धिमत्ता, सखोल ज्ञान आणि चांगली प्रतिभा होती. वाङ्मयाच्या बहुतेक अंगांवर व्याकरण, कोश, काव्य, छंद, नीति, योग, चरित्र इत्यादी हेमचंद्राची लेखणी चाललेली आहे. हेमचंद्राचे लेखन संस्कृत आणि प्राकृत या दोनही भाषांत आहे. त्याचे बहुतेक लेखन आपल्या आश्रयदात्या राजाच्या सूचनेवरून झालेले दिसते. आपल्या ज्या ग्रंथांचे अधिक