________________
प्राकृत व्याकरणे
१६७
अस्मदीयः अम्हकेरो। न च भवति। मईअ-पक्खे। पाणिणीआ। (अनु.) (त्याचे वा अमक्याचे) हे (आहे) या अर्थी असणाऱ्या प्रत्ययाला केर
असा आदेश होतो. उदा. युष्मदीयः...अम्हकेरो. (कधी असा आदेश) होतही नाही. उदा. मईअपक्खे, पाणिणीआ.
(सूत्र) परराजभ्यां कडिक्कौ च ।। १४८।। (वृत्ति) पर राजन् इत्येताभ्यां परस्येदमर्थस्य प्रत्ययस्य यथासङ्ख्यं संयुक्तौ
क्को डित् इक्कश्चादेशौ भवतः। चकारात्केरश्च। परकीयं पारक्कं
परक्कं पारकेरं। राजकीयं राइक्कं रायकेरं। (अनु.) पर, राजन् या शब्दांपुढे येणाऱ्या (त्याचे वा अमक्याचे) हे (आहे) याअर्थी
असणाऱ्या प्रत्ययाचे अनुक्रमे संयुक्त व्यंजनयुक्त असे क्क आणि डित् इक्क असे आदेश होतात. आणि (सूत्रात) चकार वापरला असल्यामुळे, (या इदमर्थी प्रत्ययाला) केर असाही आदेश होतो. उदा. परकीयम्...रायकेरं.
(सूत्र) युष्मदस्मदोऽञ एच्चयः ।। १४९।। (वृत्ति) आभ्यां परस्येदमर्थस्याञ एच्चय इत्यादेशो भवति। युष्माकमिदं यौष्माकं
तुम्हेच्चयं। एवम् अम्हेच्चयं। (अनु.) युष्मद् आणि अस्मद् यांच्या पुढे येणाऱ्या इदमर्थी असणाऱ्या अञ् या
प्रत्ययाला एच्चय असा आदेश होतो. उदा. तुमचे हे (युष्माकं इदं) (या अर्थाने बनलेल्या) यौष्माकम् (पासून) तुम्हेच्चयं (हे रूप होते). याचप्रमाणे :- अम्हेच्चयं.
(सूत्र) वतेवः ।। १५०॥ (वृत्ति) वते: प्रत्ययस्य द्विरुक्तो वो भवति। महुरव्व पाडलिउत्ते पासाया। (अनु.) वत् (=वति) प्रत्ययाचा द्वित्वयुक्त व (म्हणजे व्व) होतो. उदा.
___ महुरव्व....पासाया.
१ मदीयपक्षे, पाणिनीयाः
२ मथुरावत् पाटलिपुत्रे प्रासादाः।
A-Proof