________________
१६६
द्वितीयः पादः
( सूत्र ) शीलाद्यर्थस्येर: ।। १४५।।
(वृत्ति) शीलधर्मसाध्वर्थे विहितस्य प्रत्ययस्य इर इत्यादेशो भवति । हसनशील: हसिरो। रोविरो'। लज्जिरो । जंपिरो । वेविरो। भमिरो। ऊससिरो। केचित् तृन एव इरमाहुस्तेषां नमिरगमिरादयो न सिध्यन्ति । तृनोऽत्र रादिना बाधितत्वात्।
(अनु.) शील, धर्म आणि साधु या अर्थी सांगितलेल्या प्रत्ययाला इर असा आदेश होतो. उदा. हसनशीलः हसिरो; (याचप्रमाणे :-) रोविरो...ऊससिरो. तृन् या प्रत्ययालाच इर आदेश होतो असे काहीजण म्हणतात; पण त्यांच्या बाबतीत मग नमिर, गमिर, इत्यादि शब्द सिद्ध होत नाहीत; कारण येथे तृन् चा र इत्यादीने बाध होतो.
( सूत्र ) क्त्वस्तुमत्तूण - तुआणाः ।। १४६ ।।
(वृत्ति) क्त्वाप्रत्ययस्य तुम् अत् तूण तुआण इत्येते आदेशा भवन्ति । तुम्। दट्ठं । मोत्तुं । अत्। भमिअ' । रमिअ' । तूण । घेत्तूण । काऊण" । तुआण। भेत्तु आण' । सोउआणः । वन्दित्तु इत्यनुस्वारलोपात्। वन्दित्ता१० इति सिद्धसंस्कृतस्यैव वलोपेन । कट्टु ? इति तु आर्षे ।
(अनु.) क्त्वा या प्रत्ययाला तुम्, अत्, तूण आणि तुआण असे हे आदेश होतात. उदा. तुम्:- दट्टु, मोत्तुं; अत् :- भमिअ, रमिअ; तूण :- घेत्तूण, काऊण; तुआण :- भेत्तुआण, सोउआण. वंदित्तु हे रूप अनुस्वाराचा लोप होऊन झाले आहे. वंदित्ता हे रूप संस्कृतमधील (वन्दित्वा या) सिद्ध शब्दातील व् चा लोप होऊन बनले आहे. आर्ष प्राकृतात मात्र कट्टु असे रूप होते.
( सूत्र ) इदमर्थस्य केरः ।। १४७।।
( वृत्ति) इदमर्थस्य प्रत्ययस्य केर इत्यादेशो भवति । युष्मदीयः तुम्हकेरो ।
१ रोदनशील, लज्जावान्, जल्पनशील, वेपनशील, भ्रमणशील, उच्छ्वसनशील.
२-९ मूळ संस्कृत धातू असे :- दृश्, मुच्, भ्रम्, रम्, ग्रह, कृ, भिद्, श्रु, १० वन्दू, ११ कृ