________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
( सूत्र ) अधसो हेट्ठ ।। १४१।।
(वृत्ति) अधस् - शब्दस्य हेट्ठ इत्ययमादेशो भवति । हेट्ठ । (अनु.) अधस् या शब्दाचा हेट्ठ असा हा आदेश होतो. उदा. हेट्ठ.
१६५
( सूत्र ) मातृपितु: स्वसुः सिआछौ ।। १४२ ।।
( वृत्ति) मातृपितृभ्यां परस्य स्वसृशब्दस्य सिआ छा इत्यादेशौ भवतः । माउसिआ माउच्छा । पिउसिआ पिउच्छा।
(अनु.) मातृ आणि पितृ या शब्दांच्यापुढे ( येणाऱ्या) स्वसृ शब्दाचे सिआ आणि छा असे आदेश होतात. उदा. माउसिआ... पिउच्छा.
( सूत्र ) तिर्यचस्तिरिच्छिः ।। १४३।।
( वृत्ति) तिर्यच् - शब्दस्य तिरिच्छिरित्यादेशो भवति । तिरिच्छिः पेच्छइ । आर्षे तिरिआ इत्यादेशोऽपि । तिरिआ ।
(अनु.) तिर्यच् या शब्दाचा तिरिच्छि असा आदेश होतो. उदा. तिरिच्छि पेच्छइ. आर्ष प्राकृतात तिरिआ असासुद्धा आदेश होतो. उदा. तिरिआ.
( सूत्र ) गृहस्य घरोपतौ ।। १४४ ।।
(वृत्ति) गृहशब्दस्य घर इत्यादेशो भवति पतिशब्दश्चेत् परो न भवति । घरो । घरसामी२। रायहरं३। अपताविति किम् ? गहवई ४ |
(अनु.) गृहशब्दाला घर असा आदेश होतो; पण (गृह शब्दाच्या) पुढे पति हा शब्द असल्यास (घर हा आदेश ) होत नाही. उदा. घरो... हरं. पति हा शब्द पुढे नसताना असे सूत्रात का म्हटले आहे ? (कारण पति शब्द पुढे असल्यास गृह शब्दाला घर असा आदेश होत नाही. उदा.) गहवई.
१ तिर्यक् प्रेक्षते । २ गृहस्वामी ३ राजगृह ४ गृहपति