________________
१६४
'वा बृहस्पतौ' या सूत्राने (ऋ या स्वराचे) इकार आणि उकार झाले असता :- बिहस्सई...बुहप्पई (अशी रूपे होतील).
द्वितीयः पादः
( सूत्र ) मलिनोभय - शुक्ति - छुप्तारब्ध - पदातेर्मइलावह-सिप्पिछिक्काढत्त-पाइक्कं ।। १३८।।
(वृत्ति) मलिनादीनां यथासङ्ख्यं मइलादय आदेशा वा भवन्ति । मलिनं मइलं मलिणं। उभयं अवहं । उवहमित्यपि केचित्। अवहोआसं उभयबलं। आर्षे। उभयोकालं । शुक्ति सिप्पी सुत्ती । छुप्त छिक्को छुत्तो। आरब्ध आढत्तो आरद्धो । पदाति पाइको पयाई ।
(अनु.) मलिन इत्यादि (= मलिन, उभय, शुक्ति, छुप्त, आरब्ध आणि पदाति, या) शब्दांचे अनुक्रमे मइल इत्यादि (= मइल, अवह, सिप्पि, छिक्क, आढत्त आणि पाइक्क असे) आदेश विकल्पाने होतात. उदा. मलिन... अवहं ; काहींच्या मते (उभय चा) उवह असासुद्धा ( आदेश होतो ) ; अवहोआसं...बलं. आर्षप्राकृतात उभयोकालं (असे आढळते); शुक्ति... पयाई.
( सूत्र ) दंष्ट्राया दाढा ।। १३९।।
(वृत्ति) पृथग्योगाद्वेति निवृत्तम् । दंष्ट्राशब्दस्य दाढा इत्यादेशो भवति । दाढा। अयं संस्कृतेऽपि।।
(अनु.) (हे सूत्र ) वेगळे करुन सांगितले असल्याने, (सूत्र २.१२१ मधून अनुवृत्तीने येणाऱ्या) वा शब्दाची येथे निवृत्ति होते. दंष्ट्रा शब्दाचा दाढा असा आदेश होतो. हा (दाढा शब्द) संस्कृतातसुद्धा आहे.
(सूत्र) बहिसो बाहिं बाहिरौ ।। १४० ।।
(वृत्ति) बहि:शब्दस्य बाहिं बाहिर इत्यादेशौ भवतः । बाहिं बाहिरं । (अनु.) बहिः या शब्दाचे बाहिं आणि बाहिर असे आदेश होतात. उदा. बाहिं,
बाहिरं.
१ उभयबलम्
२ उभयकालम्