________________
१६०
द्वितीयः पादः
(सूत्र) महाराष्ट्रे हरोः ।। ११९।। (वृत्ति) महाराष्ट्र शब्दे हरोर्व्यत्ययो भवति। मरहठें । (अनु.) महाराष्ट्र या शब्दात ह आणि र यांचा व्यत्यय होतो. उदा. मरहटुं.
(सूत्र) ह्रदे हदोः ।। १२०।। (वृत्ति) ह्रदशब्दे हकारदकारयोर्व्यत्ययो भवति। द्रहो। आर्षे। हरए' महपुण्डरिए। (अनु.) ह्रद या शब्दात हकार आणि दकार यांचा व्यत्यय होतो. उदा. द्रहो. आर्ष
प्राकृतात (द्रहमध्ये स्वरभक्ति होते. उदा.) हरए महपुण्डरिए.
(सूत्र) हरिताले रलोर्न वा ।। १२१।। (वृत्ति) हरितालशब्दे रकारलकारयोर्व्यत्ययो वा भवति। हलिआरो हरिआलो। (अनु.) हरिताल या शब्दात रकार आणि लकार यांचा व्यत्यय विकल्पाने होतो.
उदा. हलिआरो, हरिआलो.
(सूत्र) लघुके लहोः ।। १२२।। (वृत्ति) लघुकब्दे घस्य हत्वे कृते लहोर्व्यत्ययो वा भवति। हलुअं। लहुअं।
___ घस्य व्यत्यये कृते पदादित्वाद् हो न प्राप्नोतीति हकरणम्। (अनु.) लघुक या शब्दात घ चा ह केला असता ल आणि ह यांचा व्यत्यय
विकल्पाने होतो. उदा. हलुअं, लहुअं. घ चा व्यत्यय केला असता घ हा पदाचा आदि होत असल्याने त्याचा ह होत नाही; (म्हणून प्रथम घ चा) ह करावयाचा आहे.
(सूत्र) ललाटे लडोः ।। १२३।। (वृत्ति) ललाटशब्दे लकारडकारयोर्व्यत्ययो भवति वा। णडालं णलाडं ।
ललाटे च (१.२५७) इति आदेर्लस्य णविधानादिह द्वितीयो लः स्थानी।
१ हृदे महापुण्डरीके।