________________
प्राकृत व्याकरणे
१६१
(अनु.) ललाट या शब्दात लकार आणि डकार यांचा व्यत्यय विकल्पाने होतो.
उदा. णडालं, णलाडं. 'ललाटे च' या सूत्राने आदि ल चा ण होत असल्याने येथे द्वितीय ल हा स्थानी आहे (म्हणजे दुसरा ल आणि ड यांचा व्यत्यय होतो).
(सूत्र) ह्ये ह्योः ।। १२४।। (वृत्ति) ह्यशब्दे हकारयकारयोर्व्यत्ययो वा भवति। गुह्यं गुय्हं गुज्झं। सह्यः
सय्हो सज्झो। (अनु.) ह्य या शब्दात हकार आणि यकार यांचा व्यत्यय विकल्पाने होतो. उदा.
गुह्यम...सज्झो.
(सूत्र) स्तोकस्य थोक्कथोवथेवा: ।। १२५।। (वृत्ति) स्तोकशब्दस्य एते त्रय आदेशा भवन्ति वा। थोक्कं थोवं थेवं। पक्षे।
थो। (अनु.) स्तोक शब्दाचे थोक्क, थोव आणि थेव (असे) हे आदेश विकल्पाने
होतात. उदा. थोक्कं...थेवं. (विकल्प-) पक्षी:- थोअं.
(सूत्र) दुहितृभगिन्योधूआबहिण्यौ ।। १२६।। (वृत्ति) अनयोरेतावादेशौ वा भवतः। धूआ दुहिआ। बहिणी भइणी। (अनु.) दुहितृ आणि भगिनी यांचे धूआ आणि बहिणी हे आदेश विकल्पाने होतात.
उदा. धूआ...भइणी.
(सूत्र) वृक्षक्षिप्तयो रुक्खछूढौ ।। १२७।। (वृत्ति) वृक्षक्षिप्तयोर्यथासंख्यं रुक्ख छूढ इत्यादेशौ वा भवतः। रुक्खो वच्छो।
छूढं खित्तं। उच्छूटं उक्खित्तं । (अनु.) वृक्ष आणि क्षिप्त या शब्दांचे अनुक्रमे रुक्ख आणि छूढ असे आदेश
विकल्पाने होतात. उदा. रुक्खो...उक्खित्तं.
१ उत्क्षिप्त.
A-Proof