________________
प्राकृत व्याकरणे
१५९
(अनु.) एकस्वर असणाऱ्या पदातील जे श्वस् (श्व:) आणि स्व असे दोघे त्यांच्यामध्ये
अन्त्य व्यंजनापूर्वी उ येतो. उदा. श्वः....जणा. एकस्वर असणाऱ्या (पदात) असे का म्हटले आहे ? (कारण पद एकस्वर नसल्यास, इथे सांगितलेले वर्णान्तर होत नाही. उदा.) स्वजन: सयणो.
(सूत्र) ज्यायामीत् ।। ११५।। (वृत्ति) ज्याशब्दे अन्त्यव्यञ्जनात्पूर्व ईद् भवति। जीआ। (अनु.) ज्या या शब्दात, अन्त्य व्यंजनापूर्वी ई येतो. उदा. जीआ.
(सूत्र) करेणूवाराणस्यो रणोर्व्यत्ययः ।। ११६।। (वृत्ति) अनयो रेफणकारयोर्व्यत्ययः स्थितिपरिवृत्तिर्भवति। कणेरु। वाणारसी।
स्त्रीलिंगनिर्देशात्पुंसि न भवति। एसो' करेणू। (अनु.) करेणू आणि वाराणसी या शब्दांत रेफ आणि णकार यांचा व्यत्यय (म्हणजे)
स्थितिपरिवृत्ति (स्थानामध्ये बदल) होते. उदा.कणेरू, वाणारसी. (सूत्रामध्ये करेणू या शब्दात) स्त्रीलिंगाचा निर्देश असल्याने (करेणु शब्द) पुल्लिंगात (असताना स्थितिपरिवृत्ति) होत नाही. उदा. एसो करेणू।
(सूत्र) आलाने लनोः ।। ११७।। (वृत्ति) आलानशब्दे लनोर्व्यत्ययो भवति। आणालो। आणालक्खम्भो। (अनु.) आलान या शब्दांत ल आणि न यांचा व्यत्यय होतो. उदा. आणालो;
आणालक्खम्भो.
(सूत्र) अचलपुरे चलो: ।। ११८।। (वृत्ति) अचलपुरशब्दे चकारलकारयोर्व्यत्ययो भवति। अलचपुरं। (अनु.) अचलपुर या शब्दात चकार आणि लकार यांचा व्यत्यय होतो. उदा.
अलचपुरं.
१ एषः करेणुः।
२ आलानस्तम्भ
A-Proof