________________
१५२
( सूत्र ) न दीर्घानुस्वारात् ।। ९२ ।। ( वृत्ति) दीर्घानुस्वाराभ्यां लाक्षणिकाभ्यामलाक्षणिकाभ्यां च परयोः शेषादेशयोर्द्वित्वं न भवति। छूढो'। नीसासो। फासो। अलाक्षणिक। पार्श्व पासं । शीर्षं सीसं । ईश्वरः ईसरो । द्वेष्य: वेसो । लास्यं लासं । आस्यम् आसं। प्रेष्यः पेसो । अवमाल्यम् ओमालं । आज्ञा आणा । आज्ञप्तिः आणत्ती। आज्ञपनं आणवणं । अनुस्वारात्। त्र्यस्रम् तंसं। अलाक्षणिक । संझा | विंझो । कंसालो ।
द्वितीयः पादः
(अनु.) लाक्षणिक तसेच अलाक्षणिक अशा दीर्घ (स्वर) आणि अनुस्वार यांच्यापुढे शेष व्यंजन तसेच आदेश व्यंजन यांचे द्वित्व होत नाही. उदा. छूढो... फासो. अलाक्षणिक (दीर्घ स्वरापुढे ) :- पार्श्वम्... आणवणं. (लाक्षणिक) अनुस्वारापुढे :- त्र्यस्रम् तंसं. अलाक्षणिक (अनुस्वारापुढे ) :संझा... कंसालो.
-
( सूत्र ) रहो: ।। ९३ ।।
(वृत्ति) रेफहकारयोर्द्वित्वं न भवति । रेफः शेषो नास्ति । आदेश । सुन्दरं । बम्हचेरं। पेरन्तं। शेषस्य हस्य । विहलो । आदेशस्य । कहावणो । (अनु.) रेफ व हकार यांचे द्वित्व होत नाही. रेफ (हा कधीच ) शेष व्यंजन असत नाही. (रेफ) आदेश असताना :- सुंदेरं... पेरंतं. शेष ह ( चे द्वित्व होत नाही. उदा ) विहलो. आदेश असणाऱ्या (ह चे द्वित्व होत नाही. उदा.) कहावणो.
( सूत्र ) धृष्टद्युम्ने णः ।। ९४।।
(वृत्ति) धृष्टद्युम्ने आदेशस्य णस्य द्वित्वं न भवति । धट्ठज्जुणो । (अनु.) धृष्टद्युम्न या शब्दात आदेश म्हणून येणाऱ्या ण चे द्वित्व होत नाही.
उदा.
धट्ठज्जुणो.
१ क्षिप्त, नि:श्वास, स्पर्श.
३ सौन्दर्य, ब्रह्मचर्य, पर्यन्त ।
२ संध्या, विन्ध्य, कांस्ययुक्त ४ विह्वल
५. कार्षापण